महाराष्ट्र साैर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे. या क्षेत्रात हाेत असलेल्या भरीव कामामुळे माेठी ग्रीन इकाे सिस्टीम निर्माण हाेणार आहे. ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने या संदर्भात धाेरण तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.उद्याेग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 13 वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्याेग मंत्री उदय सामंत, सचिव राजेश कुमार, अतिर्नित मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित हाेते.
जागतिक कर संरचनेच्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील वस्त्राेद्याेगावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर विद्युत शुल्क सवलतीची औद्याेगिक अनुदानातून वजावट केली जाणार नाही; तसेच विदर्भ, मराठवाडा या वर्गीकृत क्षेत्रासाठी कॅप्टीव्ह प्राेसेस व्हेंडर संदर्भातील तरतुदींत सुधारणा करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वर्गीकरण ‘अ’ व ‘क’ वर्गीकृत तालुका क्षेत्रात करण्यात आल्याने खेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व खेड डेव्हलपर्स लि. यांना ‘क’ वर्गीकृत तालुक्याचे फायदे लागू करण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. थ्रस्ट सेक्टर धाेरणांतर्गत प्रकल्पांना प्राेत्साहन देण्यासंदर्भात ग्रीन स्टीलसंदर्भात नियु्नत हाेणाऱ्या समितीने विचार करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.