साेनेदर पुन्हा एकदा नव्या उच्चांकावर पाेहाेचले असून, ग्राहकांवर परिणाम हाेत असल्याचे पाहून, माेठ्या ज्वेलर्सनी कॅरेट कमी करून हलक्या वजनाचे व परवडणारे दागिने बाजारात आणले आहेत. देशात साेन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 1,18,480 रुपयांवर गेले आहेत. दरम्यान, रुपया डाॅलरसामाेर घसरल्याने साेन्याकडे ग्राहकांचा कल वाढत असून, त्यामुळे देशांतर्गत बाजारात या धातूचे भाव अधिकच वाढले आहेत. महिन्यात साेन्याचे दर देशांतल्या बाजारात तब्बल 12,861 रुपयांनी वाढून 1,18,480 रुपयांवर गेले आहेत.
तरुण पिढीमध्ये लाेकप्रिय हाेत असलेले 9 कॅरेटचे दागिने कंपनीला अधिक ग्राहकवर्गापर्यंत पाेहाेचण्यात मदत करत आहे. तसेच, प्रथमच साेने खरेदी करणाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल,’ स्काय गाेल्ड अँड डायमंड्सचे दर्शन चाैहान यांनी सांगितले.‘9 कॅरेट साेने हे 22 कॅरेट साेन्यापेक्षा सुमारे 60 ते 65 टक्के स्वस्त आहे.
18 कॅरेट साेन्याचे भाव तुलनेने 20% कमी असतील. उदाहरणार्थ, जर 22 कॅरेट साेन्याचा दर प्रति ग्रॅम 19,300 रुपये असेल, तर 18 कॅरेट सुमारे 7,500 ते 7,600 रुपये व 9 कॅरेट सुमारे 3,750 ते 3,850 रुपये, इतक्या दरात उपलब्ध असेल,’ सेनकाे गाेल्डचे सुवंकर सेन यांनी सांगितले.‘सातत्याने वाढणाऱ्या साेन्याच्या दरामुळे सामान्य माणसासाठी साेन्याचे दागिने परवडेनासे झाले आहेत, त्यामुळे कमी कॅरेटच्या दागिन्यांची मागणी वाढू लागली आहे,’ सेन पुढे म्हणाले.‘मागील काही महिन्यांत साेन्याचे दर झपाट्याने वाढले, पण ग्राहकांचे बजेट त्या प्रमाणात वाढले नाही. त्यामुळे ते बजेट- फ्रेंडली पर्यायांचा शाेध घेत आहेत. यामुळे, हलक्या वजनाच्या आणि कमी कॅरेट साेन्याच्या दागिन्यांच्या सेगमेंटमध्ये 30% वार्षिक वाढ झाली असून, उद्याेगाच्या चालू आर्थिक वर्षात महसुलात 30 ते 35% वाढ हाेईल, असा अंदाज वर्तवला जात आहे,’ पीएनजी ज्वेलर्सचे डाॅ. साैरभ गाडगीळ यांनी सांगितले.‘जरी साेन्याचे दर नवे उच्चांक गाठत असले तरी, सणासुदीच्या काळात साेने ग्राहकांसाठी आनंद आणि समृद्धी आणते. बहुतेक ग्राहक जुन्या दागिन्यांची देवाणघेवाण करून नवे दागिने खरेदी करतात.