विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या याेजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी.यासाठी केंद्र सरकार सर्वताेपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले. महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या याेजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्राकडून समन्वय हाेणे आवश्यक आहे. राज्य कुपाेषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली.
यावेळी विविध राज्यांच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित हाेते. विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासंदर्भात, तसेच याेजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव संसाधन धाेरण, पुरेशा पायाभूत सुविधा, आर्थिक समताेल, न्याय्य वेतन, विश्वसनीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि अनुदान यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. राज्यात महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी ठाेस धाेरणे व याेजना कार्यरत आहेत. त्यांचा परिणामकारक लाभ नागरिकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी केंद्राकडून अधिक निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र या याेजनांच्या अंमलबजावणीत देशात आदर्श ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.