काेल्ड्रिफचा राज्यातील साठा गाेठवणार

    08-Oct-2025
Total Views |
 

cough 
 
खाेकल्यावरील औषध काेल्ड्रिफमुळे मध्य प्रदेश व राजस्थानात काही बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या तपासणीत या औषधात ‘डायइथिलीन ग्लायकाेल’ हा विषारी घटक मिसळल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे या औषधाचा वापर तत्काळ थांबवावा; तसेच काेणाकडे हे औषध असल्यास त्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला कळवावे, असे आवाहन राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे.तमिळनाडूतील औषध कंपनी काेल्ड्रिफ सिरप या औषधाची निर्मिती करते. या औषधाच्या सेवनाने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या औषधाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत औषधात डायइथिलीन ग्लायकाेल हा विषारी घटक मिसळल्याचे स्पष्ट झाले.
 
राज्यात वितरण झालेल्या या औषधाच्या साठ्याबाबत कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाने तमिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधला असून, या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाची माहिती घेतली जात आहे. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता ताे साठा गाेठवावा, अशा सूचना सर्व औषध निरीक्षक व सहायक आयु्नतांना प्रशासनाने दिल्या आहेत; तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि धाेका टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन औषध नियंत्रक दा. रा. गहाणे यांनी केले आह