एमएसआरडीसी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण, गतीने पूर्ण करा : बाेर्डीकर यांचे निर्देश

    08-Oct-2025
Total Views |
 

bord 
 
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांनी दिले. एमएसआरडीसीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल; तसेच भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. प्रकल्पांच्या गतीत दिरंगाई चालणार नाही, असा इशारा साकाेरे-बाेर्डीकर यांनी दिला. रेवस-रेड्डी राष्ट्रीय महामार्गातील गुहागर तालुक्यातील 13 ते 15 कि.मी. रस्त्याचे पुनःसर्वेक्षण व फेररचना, विरार-अलिबाग महामार्ग, नाशिक शहर वर्तुळाकार रस्ता (रिंग राेड) तसेच भंडारा-गडचिराेली द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.