निराेगी राहण्यासाठी काय करता येईल?

    06-Oct-2025
Total Views |
 

Health 
 
 सकाळी उठल्यावर मी 2 ग्लास काेमट पाणी पिताे आणि मग दिवसाला सुरवात करताे.
 
 त्यानंतर किमान चाळीस ते साठ मिनिटे याेगासने, सूर्यनमस्कार, धावणे, सायकलिंग, पाेहणे या गाेष्टी आलटून पालटून मी करताे. एके दिवशी सूर्यनमस्कार आणि सायकलिंग, दुसऱ्या दिवशी धावणे आण याेगासने अशा पद्धतीने राेज किमान मी एक तास व्यायाम करताे.
 
 व्यायामानंतर आंघाेळ, वर्तमानपत्रांचे वाचन या गाेष्टी उरकून मी पाेटभर न्याहरी करताे. त्यामध्ये कधी उकडलेली अंडी, दूध, पाेहे, इडली, उपमा असे पदार्थ असतात.कधीकधी मी न्याहरीच्या वेळीच पाेटभर पाेळीभाजी, भात खाताे.
 
 नंतर माझ्या दुचाकीवरून ऑिफसला जाताे. ऑिफस घरापासून सुमारे 18 किलाेमीटर अंतरावर असल्याने जाण्यासाठी चाळीस ते पन्नास मिनिटे आणि कधीकधी एक तास लागताे. त्यामुळे प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मी पूर्ण चेहरा झाकूनघेतलेला असताे. डाेक्यावर हेल्मेट असते.
 
मी शक्यताे ुलशर्ट घातलेला असताे त्यामुळे हात झाकलेले असतात. दुचाकी चालवताना कायम शूज घालावेत असा नियम मी पाळताे. त्यामुळे माझे संपूर्ण शरीर झाकलेले असते.जर तुम्ही काॅर्पाेरेट ऑिफसमध्ये काम करत असाल तर दर दाेन तासांनी जागेवरून उठून दाेन-तीन मिनिटे शरीराच्या सगळ्या अवयवांना ताण द्या. दुपारच्या लंचनंतर त्याच ठिकाणी किमान पंधरा मिनिटे चाला.संध्याकाळी देखील चहा घेतल्यावर काही मिनिटे शांतपणे चालण्याची सवय ठेवा.संध्याकाळी घरी परत येताना सकाळी जसे संपूर्ण शरीर झाकलेले हाेते तसेच सर्व जामानिमा करून ऑिफसमधून निघा. लक्षात घ्या हवेतील प्रदूषणाचा शरीरावर आणि विशेषतः त्वचेवर परिणाम हाेऊ नये म्हणून ही दक्षता घेणे गरजेचे आहे.
 
अन्यथा त्वचेच्या तक्रारी सुरु झाल्यानंतर डाॅक्टर तुम्हांला यापेक्षा जास्त दक्षता घ्यायला सांगतील.रात्री झाेपण्याच्या आधी किमान तीन तास जेवण झालेले असेल याची काळजी घ्या.शरीराला किमान सात ते आठ तासांची गाढ आणि शांत झाेप आवश्यक असते याची नाेंद ठेवा.या सगळ्या गाेष्टींचा जास्तीत जास्त काटेकाेरपणे अवलंब करून मी माझे आराेग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करताे. पुरेशी विश्रांती, व्यायाम, सकस आणि पाैष्टिक आहार, राेजची ठरलेली दैनंदिनी याकडे नीट लक्ष देऊन स्वतः ला तंदुरुस्त ठेवता येते.लक्षात ठेवा आणि खाण्यासाठी कमावत असताे, कमावण्यासाठी खात नसताे. त्यामुळे सकस आणि घरगुती आहार यासाठी आपण पैसा खर्च केला तर औषधे आणि दवाखान्यावर खर्च करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.