या आठवड्यात तुमची ऊर्जा व उत्साह कार्यक्षेत्रात दिसेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्यामुळे तुमची सक्षमता सिद्ध हाेईल. जुन्या अर्धवट प्राेजे्नट्समध्ये वेग येईल.पण आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. भागीदारासाेबत संवाद राखावा.ज्यामुळे वाद टाळता येऊ शकतील.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा तुमच्यासाठी संधी व आव्हानांचे मिश्रण घेऊन आला आहे. जर आपण लवचिकता दाखवाल तर स्थिती वेगाने अनुकूल हाेईल व फायदा हाेईल. नाेकरदारांवर जबाबदाऱ्या साेपवल्या जाऊ शकतात.व्यापाऱ्यांना अधिक श्रम करावे लागतील. नेटवर्किंग व मार्केटिंगकडे लक्ष द्यावे.
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांमध्ये संवाद व समजूतदारपणा राखणे आवश्यक आहे. कधी कधी विचार वेगळे असू शकतात. पण संयमाने वार्तालाप केल्यास समाधान श्नय आहे. जर आपण सिंगल असाल तर मित्र व सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला आवडेल अशी व्यक्ती भेटू शकते. पण घाई करू नये.
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत काहीशी अस्थिर राहू शकते. विशेषत: मज्जासंस्था, झाेप वा पाेटासंबंधित समस्या हाेण्याची श्नयता आहे. नियमित व्यायाम, हलका आहार आणि पुरेसे पाणी प्यावे. तणाव व मानसिक थकवा येणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्यान व मेडिटेशन लाभदायक ठरेल.
शुभदिनांक : 6, 7, 11
शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अतिबडबड करणे टाळा. विनाकारण वादात पडू नका.खासगी गाेष्टी सार्वजनिक करू नका. तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका.
उपाय : या आठवड्यात पांढरी वस्त्रे धारण करावीत व पांढरे फूल दान करावे.बुधावी फेंट निळा रंग वापरणे शुभ आहे. तांब्याचा लाेटा ठेवा वा तांब्याचे सामान घरात असावे.