मराठी भाषा कायम अभिजातच : मुख्यमंत्री

    05-Oct-2025
Total Views |
 
 
 

CM 
‘भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात हाेती, आजही आहे आणि उद्याही अभिजातच राहील,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, मुख्य पाेस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, राज्य विश्वकाेष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्रशाेभणे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद माेरे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर उपस्थित हाेते.
 
मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती राज्याच्या संस्कृतीचा श्वास आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पाेहाेचवण्याचे काम राज्य शासन करत राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.यावेळी हेमांगी अंक, नवभारत मासिक विशेषांक, रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील मराठीचीये काैतुके पुस्तक, संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका आणि ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी अभिजात मराठी या अ‍ॅपचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबराेबर अभिजात मराठी दिनानिमित्त टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिटाचे अनावरण मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.