नवी मुंबई, 3 ऑक्टोबर (आ.प्र.) :
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एरोड्रोम परवाना मंजूर केला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक निकषांचे पालन केल्यानंतर विमानतळाला एरोड्रोम परवाना मंजूर झाला. या परवान्यामुळे विमानतळावर विमानोड्डाण करणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यापासून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली जातील, असे एअर इंडिया समूहाने नुकतेच जाहीर केले होते, या विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून केले जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, एअर इंडिया समूहाची एअर इंडिया एक्स्प्रेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे करणार आहे.