महावितरण महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कल्याण परिमंडळात सन्मान करण्यात आला

    03-Oct-2025
Total Views |
 
 ma
 
कल्याण, 1 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
विजेसारख्या जोखमीच्या क्षेत्रात कार्यरत महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नवरात्रीच्या निमित्ताने कल्याण परिमंडळात ‌‘सन्मान सौदामिनीचा‌’ कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला. मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी कार्यरत महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. महावितरणमध्ये कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची दखल घेऊन मिश्रा यांनी हा कार्यक्रम आयोजिला होता.
 
यावेळी उपस्थित कार्यकारी अभियंता कौमुदी परदेशी, उपकार्यकारी अभियंता स्मिता काळे आणि सावनी मालंदकर, सहायक अभियंता शर्वरी पाटील, स्मिता साळुंखे, वरिष्ठ व्यवस्थापक पौर्णिमा उदावंत, उपव्यवस्थापक (विवले) मयुरी बोरसे, बाह्य स्रोत कर्मचारी सिद्धी देसाई, नीलिमा रणदिवे, तृष्णा सोनवणे, ज्योती जाधव, दर्शना कारेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता विजय फुंदे, अनिल थोरात, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सुशील पावसकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर उपस्थित होते.