महाराष्ट्र राज्याचा महसूल विभाग देशात सर्वाेत्तम ठरेल

    26-Oct-2025
Total Views |


revenue 
महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लाेकाभिमुख करण्याचा प्रयत्न हाेत आहे. मागील काही महिन्यांत लाेकहिताचे विविध निर्णय घेण्यात आले.या माध्यमातून हाेत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वाेत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्य्नत केला.बावनकुळे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबराेबर गेल्या काही महिन्यांत मंत्रालयातील तसेच क्षेत्रीय पातळीवरील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबराेबर जमाबंदी आयु्नत तसेच नाेंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत यंत्रणेने सेवा पंधरवडा,वाळू धाेरण, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, तुकडेबंदी, जिवंत सातबारा, स्थानिक विषय आदींमध्ये प्रचंड काम केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे काैतुक केले.
 
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयु्नत सुहास दिवसे, नाेंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, सर्व विभागीय आयु्नत, जिल्हाधिकाऱ्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित हाेते.सर्वसामान्यांना वाळू तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी वाळू धाेरणाचे पालन करून नाेव्हेंबरअखेर सर्व वाळू गटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीच्या निधीचे याेग्य वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षात नागरिकांच्या फायद्यासाठी महसूल विभागांतर्गत ज्या नियमांत, कायद्यांत सुधारणा करणे आवश्यक आहे त्या सूचवण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागातील अनेक पदांच्या पदाेन्नत्या झाल्या असून, येत्या तीन महिन्यांत विभागातील उर्वरित पदांच्या पदाेन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण हाेईल, असेही त्यांनी सांगितले.