बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी

    26-Oct-2025
Total Views |
 

beed 
 
दिवाळी नवीन घरकुलात या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास याेजना (पीएमएवाय); तसेच राज्यपुरस्कृत घरकुल याेजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली असून, या निमित्ताने बीडकरांचे ह्नकाच्या घरात राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या कामासाठी राज्य सरकारमार्फत 990 काेटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीडचे पालक मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला ह्नकाचे घर मिळावे, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे. जिल्ह्यातील हजाराे कुटुंबांनी यंदाची दिवाळी आपल्या नव्या घरकुलात साजरी केली. हीच या याेजनेची खरी यशाेगाथा आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समर्पणभावना, नियाेजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हेच या याेजनेच्या यशस्विततेचे रहस्य आहे. काटेकाेर नियाेजन, दैनंदिन देखरेख आणि टीमवर्कचा हा विजय आहे. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या पीएमएवाय (साॅफ्ट) अ‍ॅपचा माेठा वाटा आहे. या अ‍ॅपद्वारे प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट प्रभागाची जबाबदारी देण्यात आली हाेती. लाभार्थ्यांशी सतत संपर्क ठेवूबांधकाम सुरू ठेवण्यास त्यांना प्राेत्साहित करण्यात आले.
 
सूक्ष्म नियाेजन, दैनंदिन पाठपुरावा आणि निधीचे वेळेत वितरण या त्रिसूत्रीमुळेच हे उद्दिष्ट चार महिन्यांत पूर्ण करणे शक्य झाले. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांधकामासाठी आंतरविभागीय समन्वय व बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा वेळेवर पुरवण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.ग्रामीण गृहनिर्माण हा शासनाचा प्राधान्याचा विषय असून, राज्य व केंद्रपुरस्कृत या याेजनांना बीड जिल्ह्यात विशेष गती देण्यात आली. शाश्वत विकासाच्या ध्येयाशी निगडित या उपक्रमात दिवाळीपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याला ह्नकाचे घर मिळावे या उद्देशाने नियाेजन करण्यात आले. बीड जिल्ह्याची स्थलांतराची पार्श्वभूमी लक्षात घेता ऊसताेडीपूर्वीच कुटुंबांना घर मिळावे, या दृष्टीने कामांना वेग देण्यात आला. परिणामी, हजाराे कुटुंबांना या दिवाळीत नवीन घराचा आनंद लाभला, अशी माहिती प्रशासनाने दिली.