लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून नाैदल आणि हवाई दलाचा सहभाग असलेला ‘त्रिशूल’ हा संयु्नत सराव आयाेजिण्यात येणार आहे. त्यात खाडी, वाळवंटी भागात आक्रमक हालचालींसह साैराष्ट्र किनाऱ्याजवळ माेहिमा राबवल्या जाणार असून, या सरावात गुप्तचर, देखरेख आणि गुप्त पाहणी व सायबर क्षमतांचा समावेश असलेल्या बहुआयामी संयु्नत सरावांचाही समावेश असेल.दक्षिण मुख्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधानांनी देशाच्या भविष्यातील संरक्षण सिद्धतेसाठी जय (संयु्नतता, आत्मनिर्भरता, नवाेपक्रम) हा मार्गदर्शक मंत्र दिला आहे. त्यानुसार सशस्त्र दलांनी संयु्नतता अधिक दृढ करणे, आत्मनिर्भरतेला प्राेत्साहन देणे, लष्करी नियाेजन व अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर नवाेपक्रमांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुख्यालयाने या दृष्टीने संयु्नततेची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
संयु्नतता हीच कार्यसंस्कृतीचा भाग मानून दक्षिण मुख्यालयाने नेहमीच तिन्ही दलांत सुसंवाद राखण्यावर भर दिला आहे; तसेच आत्मनिर्भरता आणि नवाेपक्रमावर आधारित परिवर्तनासाठी सातत्याने कटिबद्धता प्रदर्शित केल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.आगामी त्रिशूल या सरावात दक्षिण मुख्यालयाचे जवान विविध आणि आव्हानात्मक भूभागांवर संयु्नत कारवायांची अंमलबजावणी तपासण्यासाठी सक्रियपणे सहभागी हाेतील. या सरावाद्वारे देशी बनावटीच्या प्रणालींचा प्रभावी वापर,कार्यप्रणालींमध्ये आत्मनिर्भरतेचा अवलंब तसेच बदलत्या युद्धपद्धतींनुसार रणनीती, तंत्र आणि पद्धतींचा समावेश अधाेरेखित करण्यात येईल. देशात सण साजरे केले जात असताना दक्षिण मुख्यालयाचे जवान सातत्याने प्रशिक्षण घेऊन त्रिशूल या सरावासाठी सज्ज हाेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.