हजाराे दिव्यांनी उजळला वसईचा ऐतिहासिक किल्ला

    23-Oct-2025
Total Views |
 

vasai 
शाैर्य आणि बलिदानाचे प्रतीक असणारा वसई किल्ला आणि नरवीर चिमाजीअप्पा स्मारक दिवाळीनिमित्त तीन हजार दिवे आणि शंभर मशालींनी उजळून निघाले. वसई, विरार, तसेच मुंबई, ठाणे, पालघरसारख्या विविध ठिकाणांहून एकत्र आलेल्या 400 ते 500 जणांनी प्रज्ज्वलित केलेल्या पणत्यांनी, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने किल्ला परिसरात चैतन्य संचारले हाेते.दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची वसई आणि धर्मसभाच्या विद्यमाने वसई किल्ला आणि पेशवे चिमाजीअप्पा स्मारक परिसरात माेठ्या उत्साहात दीपाेत्सव साजरा करण्यात आला.
 
यावेळी जय भवानी, जय शिवाजी आणि जय वज्रेश्वरी, जय चिमाजीच्या जयघाेषात पेशवे चिमाजी अप्पा स्मारक ते वसई किल्ला, अशी शंभर मशालींसह मिरवणूक काढण्यात आली. वसई किल्ल्यातील प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर व नागेश महातीर्थ या महत्त्वाच्या स्थळांवर, तसेच पेशवे चिमाजी अप्पा स्मारकाभाेवतालचा परिसर तीन हजार पणत्या, ताेरण, कंदील लावून व रांगाेळ्यांनी सजवण्यात आला हाेता.