दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 47 महसूल अधिकाऱ्यांना पदाेन्नतीची भेट दिली आहे. यामध्ये 23 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. वशेष म्हणजे, निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे माेकळा झाला.साेमवार, (दि. 20) राेजी याबाबतचे शासन आदेश जारी केले. अनेक लाेकाभिमुख याेजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महसुली अधिकाऱ्यांचा माेठा वाटा असताे. त्यांच्या पदाेन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही ही कामे अधिक गतीने हाेण्यास मदत हाेणार आहे.
पदाेन्नतीच्यापदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच त्यांना नवीन वेतनश्रेणी लागू हाेईल.दिवाळीचा आनंद द्विगुणित गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांचा पदाेन्नतीचा प्रश्न प्रलंबित हाेता. पदाेन्नतीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढताे आणि कामाला गतीही मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक सरकार आणि गतिमान प्रशासन देण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे.या बढतीमुळे अनेक अधिकाऱ्यांचा आयएएस हाेण्याचा मार्गही माेकळा झाला आहे.दिवाळीतच त्यांची पदाेन्नती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या अधिकाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आम्हाला यश आले, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.