फाेनवरून नजर हटेल तर बाेलणे हाेईल

    23-Oct-2025
Total Views |
 
 

pho 
राेजच्या जीवनात ही गाेष्ट सामान्य झाली आहे की, आपण एखाद्याशी बाेलू इच्छित असता पण ताे त्याच्या फाेनमध्ये व्यस्त असताे. आजुबाजूच्या लाेकांकडे दुर्लक्ष करीत अशाप्रकारे फाेनमध्ये बुडून राहण्याच्या प्रवृत्तीला ‘फबिंग’ म्हणतात. हा शब्द फाेन आणि स्नबिंग मिळून झाला आहे.विशेषज्ञांच्या मते, फबिंगची ही सवय मानसिक आराेग्य आणि नात्यांतून मिळणाऱ्या संताेषावर दुष्परिणाम करू शकते. ही वाढण्यापासून राेखण्यासाठी काही गाेष्टी ठरवणे चांगले असते. साेबत असल्यास एकमेकांचे बाेलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि आपसात उत्तम वेळ घालवणेच सर्वांची प्राथमिकता असायला हवी.जर आपल्याला एखाद्याशी बाेलायचे असेल आणि ताे फाेनवरच गुंतलेला असेल तर खाली काही अशी वा्नये दिली आहेत ज्या आपण एकमेकांना बाेलू शकता.
 
 आपल्यालाशी आत्ता बाेलू शकताे का? वा नंतर फाेनवरचे आपले काम झाल्यानंतर आपण बाेलू?
 
 आपण फाेनमधून दहा मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता का? मला काही महत्त्वाचे बाेलायचे आहे.
 
 काही मजेशीर पाहात असाल तर मलाही सांगा.
 
 सारं काही ठीक आहे ना? काेणती इमर्जन्सी तर नाही?
 
 जर एखादा आपला असेल तर त्याला सांगा की, त्याचे सतत फाेनमध्ये गुंतून राहणे त्याला उपेक्षित जाणवू देत आहे.