बेस्ट कर्मचाऱ्यांना 31 हजारांची दिवाळी भेट

    23-Oct-2025
Total Views |
 
 
BEST
 
बेस्टमधील 23596 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बेस्ट उपक्रमाच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डाॅ. साेनिया सेठी यांची बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्ट भवनात भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, दिवाळी भेट याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी भेटीइतकीच रक्कम देण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानंतर बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी निमित्ताने 31 हजार रुपये जमा करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यामुळे बेस्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.