बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘मैत्रक’च्या वतीने मदत

    23-Oct-2025
Total Views |
 
 

beed 
 
बीड जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने हजाराे कुटुंबांचे माेठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतजमीन पाण्यात बुडाली. अनेक शेतकरी आणि नागरिकांना माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.तिथल्या पीठी घाट भागात मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने 18 ऑ्नटाेबर 2025 राेजी सुमारे 350 गरजू कुटुंबांना 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य दिले गेले. त्यामुळे या कुटुंबांना आशेचा किरण मिळाला आहे. या अन्नधान्यात तांदूळ, डाळी, तेल, साखर, तसेच आवश्यक किराणा साहित्याचा समावेश हाेता.या उपक्रमामुळे तेथील गरीब कुटुंबांच्या अडचणी काही काळ विसरल्या गेल्या असतील. सणाच्या दिवशी घरात अन्न उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबांवरचा ताण दूर झाला. यानिमित्ताने सामाजिकबांधीलकीची जाणीव प्रत्येकात जागृत करायची आहे.
 
या कष्टकरी लाेकांची वाटचाल किती आव्हानात्मक आहे, हे समजून घ्यायला हवे. मदतीची ही भावना समाजातील प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे. तसेच समर्पित कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी मदतीची साक्षआहे. या प्रकारे मदत करणाऱ्या संस्थांना जास्त प्रसार आणि मदतीची गरज आहे.आपल्या संस्कृतीचे रूप संकटात एकत्र येण्याचा आणि हात जाेडून उभे राहण्याचा संदेश देते. फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र चिप्पा म्हणाले की, ‘या कुटुंबांना ही दिवाळी आनंदात आणि अडथळ्याशिवाय साजरी करता यावी, यासाठी मदतीचा हा उपक्रम आम्ही राबवित आहाेत. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करायला हवा.’ या कार्यक्रमाला संस्थेचे इतर सदस्य संदेश जाधव, मनाेज भंडारे, विजय लटंगे, सुनील जगताप, विनय अरुंदेकर, गिरीश मसाळी उपस्थित हाेते.