जाे सुखदुःखांमध्ये डळमळणार नाही ताेच स्वाधीन आहे. जाे सुखदुःखात सम राहील, ताेच स्वाधीन आहे. त्याला कुणीही पराधीन बनवू शकत नाही.पण आपल्याला तर कुणीही पराधीन करू शकताे.कारण आपल्याला कुणीही कंपवू शकतं. आपण कंप पावताच, आपल्या पायाखालची जमीनच सरकते. मग आपणाला काेणीही नुसतं असं म्हटलं की, आपण किती सुंदर आहात, आपला चेहरा किती सुंदर आहे. बस्स आपण कंप पावलातच. आता आपला उपयाेग करून घ्यायला आपण लायक झालात. आता आपणास गुलाम करणं ार साेपं आहे.‘काय हुशार आहात आपण! आपल्यासारखं डाेकं दुसरीकडे कुठे शाेधूनही सापडणार नाही.’ बस्स. असं आपणास म्हटलं की आपण कंप पावलातच. त्या माणसाने आपणास बुद्धिमान म्हणून आपणाला बुद्दू करून टाकलं.
आता आपणापेक्षा कमी बुद्धिमान माणूसही आपणाला गुलाम करून टाकताे. कंप पावलात की कमजाेर झालात.कंप पावलात की पराधीन हाेऊन गेलात.जाे काेणी अंतर्यामी सुखदुःखात कंप पावताे ताे कधीही गुलाम हाेऊन जाईल. त्याची पराधीनता सुनिश्चित आहे. ताे आताच पराधीन आहे. एक छाेटासा शब्द बाेला, की ताे कंपित झालाच. ज्याला सुख-दुःख कंपवीत नाहीत. फ्नत त्यालाच पराधीन करता येत नसते. आता त्याला काेणीही पराधीन करू शकत नाही.त्या माणसाच्या मनात कंप निर्माण करण्याचा काही उपायच राहिला नाही. आता तलवारी त्याचे शरीर कापू लागल्या तरी ताे स्थिरच राहील