मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण याेजनेंतर्गत घरकुलांचे काम व्यापक प्रमाणात सुरू असून, त्या अंतर्गत 72097 घरकुले पूर्ण झाली आहेत. भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलांचा लाभ द्यावा; तसेच पुढील उद्दिष्टेही गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे यांनी दिले.ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामांबाबत मंत्रालयात आढावा बैठकीत गाेरे यांनी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीस ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डाॅ. राजाराम दिघे तसेच ग्रामविकास विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत याेजनेच्या विविध उपक्रमांत लक्षणीय प्रगती झाली आहे.अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास याेजना टप्पा-1 आणि 2024-25 पूर्वीच्या राज्य याेजनांतील 17859 घरकुले टप्पा-2 तसेच 2024-25 पासूनच्या राज्य याेजनांतील 54238 घरकुले अशी एकूण 72097 घरकुले आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. या व्यतिर्नित सुमारे 30 लाख घरकुलांची कामे प्रगतिपथावर असून, या कालावधीत 6075 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ग्रामीण आवास याेजनांसाठीच्या उपक्रमांत झालेल्या प्रगतीबाबत गाेरे यांनी समाधान व्य्नत केले.