तुम्ही 14 वर्षांचे हाेता, तेव्हा आयुष्यात काय करत हाेता? हा प्रश्न सध्या साेशल मीडियावर गाजत आहे.याचे कारण आहे, 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये केवळ 35 चेंडूंवर शतक नाेंदवले. वैभवचे यश केवळ एका क्रिकेटरचे यश नाही, तर हे एका ट्रेंडबद्दल सांगत आहे. हा ट्रेंड आहे, जेन जीचा दबदबा.प्रत्येक क्षेत्रात नवीन पिढीची कमाल स्टार्टअप असाे, लिटरेचर असाे, कला असाे किंवा स्पाेर्ट्स, ही नवीन पिढी प्रत्येक क्षेत्रात कमाल करत आहे. त्यांचे विचार बदलले आहेत. अप्राेच बदलला आहे. त्यांचा फाेकस केवळ करिअरवर नाही, तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. वैभवसारखे अनेक युवक विविध क्षेत्रांमध्ये भारताची ओळख बनवत आहेत. माइंडसेट शिफ्ट क्रिकेटमध्ये 40 वर्षांपूर्वी एखाद्या प्लेअरने हवेत शाॅट मारला तर त्याचे काेच त्याला रागवायचे. आता खेळाडू पहिल्या बाॅलपासून बाउंड्री लगावण्याचा प्रयत्न करतात. नवीन खेळाडूंमध्ये हा माइंडसेट शिफ्ट झाला आहे.
लहानपणापासून तयारी धाेनीने 23 वर्षांचा असताना क्रिकेट डेब्यू केले हाेते. पण, आता क्रिकेट खेळायला वयाच्या 6-7 व्या वर्षांपासूनच तयारी सुरू हाेते. वयाच्या 10व्या वर्षी कुणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तर त्याला लेट मानले जाऊ लागले आहे.
याेग्य मार्गदर्शन आता प्लेअर्सला कमी वयातच याेग्य मार्गदर्शन मिळू लागले आहे. वैभवचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, त्याला क्रिकेट दिग्गज राहुल द्रविडने मार्गदर्शन केले आहे. ही खूप माेठी गाेष्ट आहे. पूर्वी असे हाेत नव्हते.जेन-जी सातत्याने शिकतात नवीन स्किल एका रिपाेर्टनुसार, देशात 62 टक्के जेन-जी आपली कमाई वाढवण्यासाठी नवनवीन स्किल शिकत आहेत. या स्किल मिलेनियल्स आणि जेन-ए्नसपेक्षा जास्त आहेत.जेन जीमध्ये 98 टक्के युवा आठवड्यातून कमीत कमी एक तास नवीन स्किल शिकविण्यासाठी खर्च करत आहेत.
तिलक मेहताने वयाच्या 13व्या वर्षी स्टार्टअप बनविला मुंबईच्या तिलक मेहताने वयाच्या 13व्या वषस्टार्टअप बनविला आहे. त्याने Papers N Parcels नावाचे लाॅजिस्टिक स्टार्टअप सुरू केले आहे. हे एक असे डिलिव्हर माॅडेल आहे, जे मुंबईतील डबेवाल्यांच्या नेटवर्कला तंत्रज्ञानाने जाेडते. त्याचा कामाचा टर्नओव्हर 100 काेटी रुपये आहे.अभिजिता गुप्ता सगळ्यात युवा लेखिका झाली अभिजिता गुप्ताला वयाच्या 7व्या वर्षी जगातील सगळ्यात कमी वयाची लेखिका हा पुरस्कार मिळाला.तिचे पहिले पुस्तक हॅपीनेस ऑल अराडंड हे 2020मध्ये प्रकाशित झाले हाेते. या पुस्तकासाठी तिला 3 लाख रुपये राॅयल्टी मिळाली हाेती.लिडियन नधास्वरम 19व्या वर्षी म्युझिकल माेजार्ट बनले चेन्नईच्या लिडियन नधास्वरम याला लिटील माेजार्ट असे म्हणतात. लिडियनने अमेरिकेतील द वर्ल्डस बेस्टमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबराेबर त्याने ए. आर.रहमानच्या म्युझिकल फिल्ममध्ये संगीतही दिले आहे.