‘आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पूर्वी आयात केलेले तंत्रज्ञान आता देशातच विकसित केले आहे आणि भविष्यातील जागतिक पातळीवर चर्चेत असलेल्या उत्पादनांतही आपला ठसा उमटवला आहे. आज भारत केवळ स्वतः च्याच गरजा पूर्ण करत नाही, तर जगाचा विश्वसनीय संरक्षण भागीदार हाेत आहे,’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. उदयाेन्मुख तंत्रज्ञानामुळे सेनादलांच्या आधुनिकीकरणासह तरुणांसाठी नवीन संधी निर्माण हाेत आहेत, असे त्यांनी नमूद केले.राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने येथील शस्त्रास्त्र संशाेधन आणि विकास संस्थेला (एआरडीई) भेट दिली. ही संस्था आर्मामेंट अँड काॅम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टीम्स (एसीई) या समूहांतर्गत कार्यरत आहे.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चाैहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, डीआरडीओचे अध्यक्ष डाॅ. समीर कामत या वेळी उपस्थित हाेते.संरक्षण क्षेत्राचे बदलते स्वरूप, बदलत्या युद्धाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात विज्ञान आणि नवाेन्मेषाला प्राधान्य देणारा देशच भविष्यात नेतृत्व करणार आहे. तंत्रज्ञान केवळ प्रयाेगशाळांपुरते मर्यादित न राहताे धाेरणात्मक निर्णयांचे, संरक्षणव्यवस्थेचे आणि भविष्यातील धाेरणांचे मूलभूत अधिष्ठान बनले आहे.
आपले ध्येय केवळ संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेपुरते मर्यादित नाही, तर पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी संस्कृती घडवून देशाला जागतिक संरक्षण नवाेन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचे आहे.संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ ध्येय नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेची सर्वांत मजबूत ढाल आहे,’ असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.विविध प्रयाेगशाळांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादनांची या समितीने पाहणी केली. त्यात अॅडव्हान्स्ड टाेड् आर्टिलरी गन सिस्टीम, पिनाक राॅकेट सिस्टीम, झाेरावर हा रणगाडा, आकाश-न्यू जनरेशन मिसाइल यांचा समावेश हाेता. समितीला राेबाेटिक्स, रेल गन, इलेक्ट्राेमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीम, हाय एनर्जी प्राेपल्शन मटेरिअल्स अशा तंत्रज्ञान विकासाविषयी माहिती देऊन संशाेधन समूहाचा भविष्यातील विकास आराखडाही सादर करण्यात आला.