आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा जेईई-नीटचा मार्ग सुकर

    20-Oct-2025
Total Views |
 
 

Adivasi 
 
देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या फिजिक्सवाला या संस्थेशी आदिवासी विकास विभागाने सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत फिजिक्सवालामार्फत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेईई-नीट प्रवेश परीक्षेबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील वैद्यकीय आणि आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर हाेणार आहे. यात नाशिकसह राज्यातील चारही अपर आयु्नत कार्यालयांचा समावेश आहे.फिजिक्सवालाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची जेईई-नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने भाैतिक, रसायन, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचे धडे देण्यात येणार आहेत.नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही अपर आयु्नत कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातून प्रत्येकी 80 याप्रमाणे 320 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली हाेती.
 
जेईई आणि नीट परीक्षेसाठी प्रत्येकी 160 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. शासकीय आश्रमशाळा बाेपेगाव (नाशिक) आणि गाेटेवाडी (कळमनुरी) येथील केंद्रावर मुलांना, तर शासकीय आश्रमशाळा पिसे (शहापूर) आणि शिंधीविहीर (वर्धा) येथील केंद्रावर मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.आदिवासी विकास विभागाच्या दिंडाेरी तालुक्यातील भाेपेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील जेईई-नीट परीक्षा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आदिवासी विकास आयु्नत लीना बनसाेड यांच्या हस्ते, तर वर्गखाेल्यांचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अपर आयु्नत दिनकर पावरा, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी अर्पिता ठुबे, सहायक आयु्नत अरुणकुमार जाधव, फिजिक्सवाला संस्थेचे संचालक रणजित सिंग, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील नेरकर, प्रमिला सावंत, अनिल महाजन, नामदेव भांगरे, मुख्याध्यापक हेमंत काेतकर आदी उपस्थित हाेते.