ऐसें जें हे शरीर। तें ते न पवतीचि पुढती नर। जे हाेऊनि ठेले अपार। स्वरूप माझें।। 8.151

    17-Oct-2025
Total Views |
 

saint 
 
आपल्या भक्ताचे रक्षण आपण कसे करताे हाच विषय याही ओवीत चालू आहे. भक्ताच्या मरणकाळी आपण यावे व त्याला आत्मसात करावे असेच काही नाही. माझा भक्त मरणाआधीच प्रेमभक्तीच्या आधारे मला सहजच मिळालेला असताे.चंद्राचा प्रकाश पाण्यात पडला असला तरी चंद्र आपल्या ठायीच असताे. अशा प्रेमभक्तीने जे माझ्याशी अखंड एकरूप झालेले असतात. त्यांना मी नेहमी सुलभतेने प्राप्त आहे. म्हणून मरणानंतर ते मलाच येऊन मिळतात.अशा जीवांना मग पुन्हा जन्म प्राप्त हाेत नाही. कष्टरूपी वृक्षांची बाग, तीनही प्रकारच्या दु:खाची शेगडी. या गाेष्टी मृत्यूचे भय, अखंड दैन्य उत्पन्न करते. हेच दुर्बुद्धीचे उगमस्थान आहे.पापकर्माचे फळ आहे. संसाराचे वसतीस्थान व कामक्राेधादिकांचे विहारस्थान आहे. हे राेगांचे ाढलेले ताटच आहे.
 
ही काळाची उष्टी खिचडी आहे. स्वभावत:च ते जन्ममरणाची वाहती वाट आहे. यात नुसता भ्रमच असताे. समजूत विपरीत झालेली असते.किंवा हे विंचवांचे पेवच समजना. हे व्याघ्राचे वसतिस्थान आहे. हे वेश्येप्रमाणे माेह निर्माण करते. नाना विषयांचा अनुभव देणारे हे चांगले पूजलेले यंत्र आहे.हे म्हणजे जाखिणीची ममता आहे. विषमिश्रित पाण्याचा घाेट म्हणजे हे भय आहे. वरून चांगला दिसणारा हा एखाद्या ठकाप्रमाणे मित्र आहे.हे भय म्हणजे कुष्ठराेगी माणसाला दिलेले आलिंगन आहे. काळरूपी सर्पाचा मऊपणा काय उपयाेगाचा? शत्रूला पाहुणचार काय कामाचा? दुर्जनांचा सत्कार कशासाठी? असे जे शरीराच्या भयाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे त्याचा समाराेप करताना ते म्हणतात की, वर वर्णन केलेले शरीर माझ्या अमर्याद स्वरूपाला येऊन पावले की त्याला पुनर्जन्म नाही.