ओशाे - गीता-दर्शन

    17-Oct-2025
Total Views |
 
 

Osho 
 
आपण म्हणाल, एक दिवसाच्या बाळाला खुशीने बॅन्ड वाजवला की नाही हे कळतही नसतं. पण आज जे वैज्ञानिक संशाेधन चालू आहे, माणसाच्या शरीर स्मृतीवर, बाॅडी-मेमरीवर, त्यातून निष्पन्न झालंय की ते बॅन्डबाजेही बालकाच्या अचेतनात प्रवेश करतात.ते बॅन्डबाजेच काय, आईच्या पाेटातील त्या गर्भावरसुद्धा झालेल्या घटनांचे पडसाद उमटतात, त्या घटनाही त्याच्या अचेतन स्मृतींचा भाग बनून जातात.त्याही त्या बालकाची निर्मिती करीत असतात.हे बॅन्डबाजे, हे माैजेचं वातावरण, सुखाशी एकरूप व्हायची ही हवा, या लहरीही त्या बालकाला निर्मित करीत राहतात.
 
अन् मग याच लहरी, मृत्युच्यावेळी दुःख आणतील! जर मरणाच्या वेळी दुःख येऊ द्यायचं नसेल तर जन्माच्या वेळेपासूनच अशी काळजी घेतली गेली पाहिजे की सुखाशी तादात्म्य करणारी व्यवस्था सतत दूर राहील. जेथून सुख सुरू हाेते तेथूनच ते ताेडणे सुरू करावे.सुखात असताना जागे हाेणे म्हणजे याेग. जागे हाेऊन पाहा की मी अलग आहे आणि मग जेव्हा दुःख येईल तेव्हाही आपल्या अलगपणाचा, पृथकतेचा अनुभव येणे अवघड जाणार नाही. तटस्थ हाेत राहा. थाेडा वेळ लागेल, उशीर लागेल, पण त्या उशीर लागण्याचं आंतरिक कारण नाहीये, आपल्या सवयी अशा मजबूत असतात, जुनाट असतात म्हणून केवळ उशीर लागताे. सुखात डाेलण्याची सवय जुनाट आहे. मजबूत आहे.