मेट्राे, बुलेट ट्रेन, मुंबई-बडाेदा महामार्ग, विशेष माल वाहतूक रेल्वे मार्गिका यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहेत, तर समृद्धी महामार्गही ठाणे जिल्ह्याला जाेडण्यात आला आहे. याचधर्तीवर आता आमने येथे ग्राेथ सेंटर उभारण्यात येणार आहे. या ग्राेथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील नरिमन पाॅइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे ग्राेथ सेंटर असणार आहे. राज्य शासनाने याला नुकतीच मंजुरी दिली आहे.ठाणे जिल्ह्यात आमने येथे समृद्धी महामार्गाची सुरुवात हाेते. तेथे राज्य शासनाकडून माेठे ग्राेथ सेंटर उभारण्यात येत आहे. आमने ग्राेथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश आहे. यातील 483 चाै. कि.मी. क्षेत्रासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियाेजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.
राज्य सरकारने कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील 46 गावांसाठी सप्टेंबर 2024 मध्ये एमएसआरडीसीची विशेष नियाेजन प्राधिकरण म्हणून नियु्नती केली हाेती. त्यावेळी 109 चाै. कि.मी.क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची नियु्नती करण्यात आली हाेती. आता यातअनगाव सापे विकास केंद्रातील 130 गावांच्या 374 चाै. कि. मी. क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.यात भिवंडीतील 148 व कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियाेजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.आमने भागातील 176 गावांत उभारण्यात येणाऱ्या ग्राेथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लाॅजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, फूड प्राेसेसिंग पार्क, इनाेव्हेशन पार्क, मेडिसिटी, स्पाेर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, अॅग्रीकल्चर हब, हाेलसेल ट्रेड सेंटरचा समावेश असेल. या समवेत रहिवासी आणि व्यावसायिक इमारती, थिम बेस पार्कचाही समावेश असेल