सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर राेबाेटिक वाॅटर क्राफ्ट तैनात

    15-Oct-2025
Total Views |
 

sindhu 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, समुद्रातील जीवितहानी टाळण्यासाठी आणि बुडणाऱ्या व्य्नतींना तात्काळ वाचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, 13 स्वयंचलित राेबाेटिक वाॅटर क्राफ्ट खरेदी केल्या आहेत.जिल्हा नियाेजन समितीच्या याेजनेतून किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 13 स्वयंचलित राेबाेटिक वाॅटर क्राफ्ट खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला हाेता. पालक मंत्री नितेश राणे यांनी त्यास त्वरित मंजुरी देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला 13 राेबाेटिक वाॅटर क्राफ्ट खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या क्राफ्टची खरेदी केली असून, पुरवठादार कंपनीचे तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लाेहार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक सदस्यांना या क्राफ्टच्या वापराचे प्रशिक्षण दिले.
 
या प्रशिक्षणात तलाठी, ग्रामसेवक, सागरी सुरक्षारक्षक, ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, काेतवाल, स्थानिक शाेध व बचावकार्याचे सदस्य, मच्छिमार, आपदा मित्र, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व जलक्रीडा व्यावसायिकांचा समावेश हाेता.पारंपरिक पद्धतीत बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी जीवरक्षकाला स्वतः समुद्रात उतरावे लागत हाेते. अनेकदा घाबरलेली बुडणारी व्य्नती वाचवायला आलेल्या व्य्नतीला पकडते. त्यामुळे वाचवणाऱ्याचा जीवही धाेक्यात येताे आणि जीवितहानी वाढते. मात्र, या राेबाेटिक वाॅटर क्राफ्टमुळे वाचवणाऱ्या व्य्नतीला स्वतः पाण्यात न उतरता, रिमाेट कंट्राेलच्या साह्याने बुडणाऱ्या व्य्नतीपर्यंत क्राफ्ट पाठवून तिला सुरक्षितपणे बाहेर काढता येणार आहे.