नवी मुंबई विमानतळाला आणखी विस्तारीकरणाचे वेध

    15-Oct-2025
Total Views |
 

mumbai 
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागले आहेत. अदानी समूहाच्या नवी मुंबई विमानतळ कंपनीने विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा प्राधिकरणाकडे सीआरझेड मंजुरीसाठी अर्ज केला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे.नवी मुंबई विमानतळ विस्तारीकरणाच्या टप्प्यात मुख्यतः येथील किनारी क्षेत्र, जैवविविधता, पूर आणि समुद्रपातळीची वाढ आदी गाेष्टी येऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन आणि स्थानिक हितसंबंधांचा विचार करून हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लागण्यासाठी सीआरझेड मंजुरी गरजेची आहे. त्यानंतरच विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे.
 
क्षमता वाढीसाठी अतिर्नित टर्मिनल्सची उभारणी, रन वे विस्तार आणि विमान वाहतूक सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. कार्गाे केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तार करून अधिक कार्यक्षम सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे.विमानतळाची प्रवासी क्षमता सध्या वर्षाला 6 काेटी इतकी आहे. ही प्रवासी क्षमता वाढवून 9 काेटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याची माहिती कंपनीने दिली. जेएनपीएचा विस्तार पाहता कार्गाे हाताळणी क्षमतेतही 1.5 दशलक्ष टनांवरून 2.25 दक्षलक्ष टनांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.विस्तारीकरणाचे काम येत्या 3 ते 4 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम हाेण्याची अपेक्षा आहे.