अत्याधिक तणाव, चिंता आणि विविध प्रकारचा मानसिक त्रास भारतीय महिलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत.मल्टिटास्किंग व अति महत्त्वाकांक्षा, वेळेचा अभाव, जबाबदाऱ्यांचे ओझे, प्रत्येक गाेष्टीत परफे्नट असण्याची इच्छा यामुळे तणाव वाढताे. मनाला तणावमुक्त करण्यासाठी चांगल्या छंदाचा आधार घेता येईल.याेगासने, मेडिटेशन याच्या आधारे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येईल.हे नियमित केले पाहिजे. हाॅर्माेनल आराेग्य स्त्रियांमध्ये मासिक चक्राबराेबर हाॅर्माे न्समधील चढ-उतार ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण, त्यात कमी-जास्त झाल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते. इन्शुलिन, थायराॅइड हाॅर्माे नच्या सिक्रीएशनमध्ये कमी झाल्यावर मधुमेह, वजन वाढण्याच्या समस्या निर्माण हाेऊ शकतात.
गॅस्ट्रिक इश्यू असिडिटी, गॅस, अपचन सारख्या पाेटाच्या समस्या चुकीच्या आहारामुळे हाेतात.सातत्याने तळकट, चटपटीत खाल्ल्यामुळे हे आजार हाेतात. यासाठी जेवताना शुद्ध, सात्त्विक,नैसर्गिक, ताजे पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्न गुणकारी व पाचक हाेते.कच्च्या सलाडमुळे वजन नियंत्रित राहतेच त्याचबराेबर चयापचय चांगले राहण्यासही माेठी मदत मिळते.आध्यात्मिक आराेग्य जागतिक आराेग्य संघटनेने दिलेल्या परिभाषेनुसार माणसाला फिजिकल, मेंटल, साेशल आराेग्याबराेबरचआध्यात्मिक स्वास्थ्यही महत्त्वाचे असते. स्त्रियांसाठी हा घटक अधिक महत्त्वपूर्ण असताे.त्यासाठी चिंतन, मनन, आत्मविश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवन संतुलित हाेते.
आराेग्य चांगले राहते. ध्यान, याेग, प्राणायामाने आपण स्वतःला अधिक समजू शकताे. जीवनातील आव्हानांचा सामनासकारात्मकतेने करू शकताे.त्वचेचे आराेग्य चांगल्या त्वचेसाठी साैंदर्य प्रसाधनांपेक्षा सुपाेषण अधिक गरजेचे असते.अॅलाेवेरासारख्या नैसर्गिक माॅइश्चराइजर्सचा वापर करता येईल.शरीराला आवश्यक तेवढे पाणी सातत्याने पिणे गरजेचे असते. त्वचेला फंगल इन्फे्नशन हाेणार नाही, यासाठी स्वच्छेतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.चकाकत्या त्वचेसाठी फळे, भाज्या, ज्यूस असे पाैष्टिक भाेजन गरजेचे असते. त्यामुळे वेळाेवेळी आहारात त्याचा समावेश असावा.वय वाढल्यामुळे त्वचेवर दिसणारा परिणामही त्यामुळे कमी हाेताे.