बाली पर्यटनासाठी उत्तम पर्याय

    15-Oct-2025
Total Views |
 
 

bali 
 
इंडाेनेशियाच्या अनेक बेटांपैकी बाली हे एक बेट आहे. आज माेठ्या संखेने भारतीय पर्यटक बालीला भेट देत आहेत. इंडाेनेशिया हे जरी मुस्लीम राष्ट्र असलं तरी इथे जवळपास 95 टक्के लाेक हे हिंदू आहेत आणि तिथे हजारपेक्षा जास्त मंदिरे आहेत.बहासा इंडाेनेशिया आणि मलय या इथल्या प्रमुख भाषा आणि इन्डाेनेशियन रुपया हे इथलं चलन. हे बेट चारही बाजूंनी सुंदर समुद्र किनाऱ्याने वेढलेलं, ताजी हवा, हिरवेगार डाेंगर, खळखळत्या नद्या, भातशेतीचे हिरवेगार गालिचे, अप्रतिम रस्ते, अधूनमधून पडणारा पाऊस, चाेहीकडे मंदिरे असे निसर्गरम्य बाली सगळ्याना आवडेल असेच आहे.
 
चारही बाजूंनी मनमाेहक सागरी किनारा लाभल्यामुळे इथे भरपूर वाॅटर स्पाेर्ट चालतात, बनाना बाेट, स्नाॅर्केलिंग, पॅराॅसेलिंग सगळं काही आहे. पाणी स्वच्छ आणि नितळ असल्यामुळे समुद्राच्या आत जाऊन तिथले मासे आणि इतर जीव आपल्याला बघायला मिळतात. तान्जुंग बेनाेआ आणि नासा दुआ हे वाॅटर स्पाेर्टसाठी प्रसिद्ध आहेत. लाेविना बीच हे बालीतलं अजून एक हा बीच डाॅल्फिन माशांसाठी प्रसिद्ध आहे बालीमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी मंदिरं आहेत. सगळी मंदिरं पाैराणिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. बसख हे बालीमधलं सगळ्यात माेठं हिंदू मंदिर आहे. हिदू लाेकांचे सगळे धार्मिक विधी याच मंदिरात केले जातात.या मंदिराच्या जवळपास गरम पाण्याची कुंडं आहेत. त्यामुळे आई वडिलांना येथे तुम्ही नक्कीच ट्रीपसाठी नेऊ शकता.