भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रांत नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लाेकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटन दरम्यानची वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दाेन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असून, व्यापारतंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले.ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दाेन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर आले आहेत. येथे राजभवनात त्यांची पंतप्रधान माेदींबराेबर चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय नेत्यांनी संयु्नत निवेदन जारी केले. त्यावेळी पंतप्रधान माेदी बाेलत हाेते.
दाेन्ही देशांतील उद्याेग क्षेत्रातील प्रतिनिधींची शिखर परिषद, सीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महाेत्सवाच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समाेर आल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.भारत-ब्रिटन एकत्र येऊन आधुनिक आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करत आहेत. त्यामुळे दाेन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण हाेतील.ब्रिटन-भारत सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार पूर्ण करणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. या करारामुळे आयात शुल्क कमी हाेईल. बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळेल. राेजगारनिर्मिती हाेईल आणि दाेन्ही देशांतील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे, असे स्टार्मर यांनी नमूद केले.बाॅलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये करण्यासाठी करार जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.