नाते बहरण्यासाठी इगाे नकाे; विश्वासाची गरज

    11-Oct-2025
Total Views |
 
 

relation 
नाते संभाळण्याचा मागच्या पिढीचा फंडा पती-पत्नीच्या नात्यातील यशस्वी संबंधांसाठी स्त्रीने पुरुषाच्या इगाेला आणि पुरुषाने स्त्रीच्या इमाेशनला सांभाळून घ्यायला शिकले पाहिजे. या गाेष्टी जपल्या तर त्यांच्या संबंधांना कुणीही ताेडू शकणार नाही, असे मागची पिढी मानायची. याच फंडावर त्यांचे नाते टिकून राहिले आणि यशस्वी झाल्याचे दिसते.नव्या पिढीचा नवा फंडा एकविसाव्या शतकात मेल इगाे आणि फिमेल इमाेशन्सचा फंडा आऊटडेटेड झाला आहे. हल्ली नातेसंबंधांमध्ये समानतेचा हिशेब हाेताे आहे. त्यामुळे दाेघांनाही इगाे आहे आणि दाेघांच्याही भावना महत्त्वाच्या आहेत. स्त्री आणि पुरुष दाेहांनीही एकमेकांचे इगाे संभाळावेत आणि दाेहांनीही एकमेकांच्या भावनांची कदर करणे हे महत्त्वाचे आहे. पुरुषांमध्येही फेमिनाईन एनर्जी असते आणि स्त्रियांमध्येही मॅस्क्युलाइन एनर्जी असते!
 
परस्परांविषयी हवा विश्वास, आदर काेणतेही नाते टिकण्यासाठी परस्परांबद्दल विश्वास, आदर गरजेचा असताे. तसाच ताे पती-पत्नीच्याही नात्यात अत्यावश्यक असताे. हल्लीच्या काळीही नात्यात परस्परांचा आदर, धैर्य, समजूतदारपणा हे आऊटडेटिंग झाले नाहीत.जीवनातील तणाव लक्षात घ्या सध्या जवळपास सगळ्यांच्याच जीवनात काही ना काही कारणाने तणाव असताे. स्पर्धा वाढली आहे. महागाई प्रचंड आहे.खर्च वाढलेला आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरही हाेत असताे. त्यातून चिडचिड वाढते. राग येताे. समाेरच्याला दुखविण्याचा हेतू नसला तरी, एकंदर तणावामुळे ताेंडातून चुकीचे शब्द जातात. त्यातून नात्यांवर वाईट परिणाम हाेताे.त्यामुळे समाेरच्या व्यक्तीच्या भावनिक विश्वात काय चालू आहे, काेणते तणाव आहेत, हे समजून घ्या. त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ हाेतील.
 
नात्यांमध्ये हवी शांतीची भावना सततच्या तणावात एखादी तरी जागा, व्यक्ती अशी हवी, जिच्या सहवासात आपल्याला शांती मिळेल. आपुलकी मिळेल, प्रेम मिळेल. सतत वेगाने धावणाऱ्या आजच्या या जगात, सतत तणाव, अस्वस्थतेच्या वातावरणात जर तुमचा पार्टनर तुमच्या जवळ येऊन तुम्हाला निवांतपणाचा अनुभव देणारा किंवा देणारी असेल तर निश्चितच तुमचे नाते अधिक सुदृढ हाेईल.सकारात्मक हाेईल.नात्यात इगाे नकाे, भावना हव्यात नातेसंबंधांमध्ये इगाे आणि भावना या एकाचवेळी बराेबर राहूच शकत नाहीत.एक वाढले म्हणजे दुसरे घटणार हे लक्षात घ्या. याविषयी मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. हरीश शेट्टी यांनी सांगितले की, इगाे वाढल्यावर भावना दबून जातात. इगाेमध्ये स्वतः प्रमुख आणि दुसरा गाैण असताे. तुला तर अक्कलच नाही. एवढंदेखील समजत नाही सारखी वाक्ये इगाेमध्ये बाेलली जातात. भावनिक नात्यात सहानुभूती असते.
 
तर इगाेमध्ये रितेपणा असताे. इगाेमध्ये जजमेंट असेल, तर भावनेत जजमेंट नसते. म्हणून सुखी दांपत्य जीवनासाठी इगाे काढून टाकायला हवा.भावनांना द्या महत्त्व नात्यात सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या भावना. जित्नया सकारात्मक भावना जास्त, तितके नाते दृढ हाेते. परस्परांबद्दल आदर, एकमेंकावर प्रेम अत्यंत गरजेचे असते. त्यामुळेच समाेरच्याला समजून घेण्याची भावनिक शक्ती निर्माण हाेते. प्रत्येकाकडून चुक हाेत असते. त्यामुळे प्रत्येक चुकीचे भांडवल करून भांडणे काढू नकात. त्यापेक्षा चुका माफ करायला शिका. त्यामुळे चुकून काही माेठ्या चुका घडल्यातरी, त्यातून बाहेर पडायला मदत मिळेल.इगाे काढून टाकायला हवा काेणतेही नातेसंबंध टिकण्यासाठी, दृढ हाेण्यासाठी मेल इगाे आणि फिमेल इगाे आणि त्या सारखे कन्सेप्ट साेडून द्यावेत.
 
पत्नी-पतीच्या नात्यात तर हे विशेषतः करण्याची गरज आहे. इगाे आवश्यक आहे आणि इगाे देखील नॅचरल आहे ही गाेष्टही साफ खाेटी आहे.इगाे आणि आत्मसन्मान वेगवेगळे काहीजण इगाे आणि आत्मसन्मान यांना एकच समजतात. त्याच्यात गल्लत करतात. या दाेन्हीही अगदीच वेगळ्या गाेष्टी आहेत.एखाद्याच्या वागण्यामुळे तुमचा अपमान हाेताे, ती व्यक्ती मर्यादाभंग करत आहे, असे वाटते, तेव्हा तुम्ही त्याला राेखता, मनाई करता याला आत्मसन्मान असे म्हणतात. आणि ताे प्रत्येकाकडे असला पाहिजे. वागण्यामध्ये लक्ष्मणरेखा आखणे हे सेल्फ-रिस्पेक्ट आणि सेल्फ-डिग्निटीमध्ये येते. मर्यादेचे भान समाेरच्याला करून देणे हा आत्मसन्मान आहे. स्वतःचे शाेषण हाेऊन देऊ नये, हा सेल्फ-रिस्पेक्ट आहे. पण, एखाद्याची साधी चूक माफ न करणे, त्यालाच मनात ठेवून त्या व्यक्तीशी वागणे हे ईगाेचे लक्षण आहे. त्यामुळे समाेरच्याकडून चुकून काही चूक घडली असेल तर, त्याला माफ करता आले पहिजे. हे ही तितकेच गरजेचे आहे.