परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (लवचिकता) अतिशय आवश्यक असते. विविध सामाजिक परिस्थितीत आणि व्यक्तींशी जुळवून घेण्याची क्षमता असणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे गैरसमज टाळता येतात. स्वतः विषयी तसेच दुसऱ्यांविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज किंवा चुकीच्या कल्पना असतात. त्यामुळे देखील समाजात वावरताना आपल्यावर मर्यादा येतात. त्यासाठी पुढील काही मुद्दे विचारात घेणे आवश्यक ठरते.
तुम्हांला वाटते तितके तुम्ही महत्त्वाचे नसता: तुमच्या अस्वस्थेतचा विचार करायला कुणालाही वेळ नसताे. समजा तुमच्या डाेक्यात माेठे काम करण्याचा विचार सुरु आहे तर लाेकांच्या डाेक्यात वेगळेच विचार चालू असतात. तुमच्या जगण्यामरण्यापेक्षा लाेकाना स्वतःच्या जगण्याची जास्त चिंता असते. म्हणून स्वतःवर लक्ष केंद्रित करा.
काैतुक करणे ही एक कला आहे: काैतुक करण्याचा, शुभेच्छा देण्याचा एक नियम आहे. ताे म्हणजे तुम्ही त्यांच्यावर काैतुक लादता आहात असे वाटता कामा नये. तुम्ही बळजबरीने काैतुक केले, उगाचच सक्तीच्या शुभेच्छा दिल्या तर तर तुम्ही गरजू आहात असे चित्र निर्माण हाेते. जेव्हा तुम्हांला एखादी गाेष्ट, काम, कलाकृती मनापासून आवडेल तेव्हाच काैतुक करा. देखल्या देवा दंडवत या पद्धतीने शुभेच्छा ेण्यापेक्षा न दिलेल्या बऱ्या.
गरजू हाेऊ नका: गरजू असल्याचे दाखवणे ही जगातील सगळ्यात माेठी कुरूपता असते. तुम्ही लाेकांचा वेळ, लक्ष आणि मान्यतेसाठी जितके हात पसराल तितकी ती तुम्हांला कमी मिळेल किंवा मिळणारच नाही.जर एखाद्या व्यक्तीकडून तुम्हांला नीट प्रतिसाद मिळत नसेल तर निघून जा. कुणी नाही म्हटले, माैन बाळगले तर ार मनाला लावून घेऊ नका.थाेडक्यात काय तर दुसऱ्यासाठी जगत बसू नका.
स्वतःविषयी नव्हे, दुसऱ्याविषयी बाेला: तुम्ही दुसऱ्याच्या विषयीचे प्रश्न विचारा.जाेपर्यंत तुम्ही गंभीरपणे विचारत आहात ताेपर्यंत व्यक्ती गांभीर्याने उत्तरे देत राहते. लाेकांना नेहमी स्वतःविषयी बाेलायला आवडते. स्वतःविषयी बाेलत राहणे त्यांना अडचणीचे वाटत नाही.