आणखी दाेन कफ सिरपमध्ये विषारी घटक

    11-Oct-2025
Total Views |
 

FDA 
 
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काेल्ड्रिफ या खाेकल्याच्या औषधात (कफ सिरप) डायथिलीन ग्लायकाेल या विषारी घटकामुळे बालकांचा मृत्यू झाला.त्यानंतर मध्य प्रदेशातील अन्न व औषध प्रशासनाने राबववलेल्या माेहिमेनंतर आणखी दाेन खाेकल्याच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकाेल हा विषारी घटक आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने किरकाेळ औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.मध्य प्रदेशात काेल्ड्रिफ या औषधामुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे.प्रशासनाने राज्यातील या उत्पादनाच्या वितरणाचा आढावा घेतला. मात्र, राज्यात काेल्ड्रिफ या खाेकल्याच्या औषधाचे वितरण झाले नसल्याचे आढळले.राज्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी अवघ्या दाेन दिवसांत मध्य प्रदेशने आणखी दाेन खाेकल्याच्या औषधांत डायथिलीन ग्लायकाेल हा विषारी घटक सापडल्याचे जाहीर केले.
 
‘रेस्पिफ्रेश टीआर’ आणि ‘रिलाइफ’ या औषधांचा यात समावेश आहे. ही दाेन्ही औषधे गुजरातमधील दाेन उत्पादक कंपन्यांची आहेत. या दाेन्ही औषधांत डायथिलीन ग्लायकाेल हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ती औषधे भेसळयु्नत व दर्जाहीन असल्याचे मध्य प्रदेश शासनाने जाहीर करत या संदर्भातील माहिती महाराष्ट्राला दिली. त्यामुळे राज्यातील किरकाेळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक, रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी या औषधांची विक्री, वितरण किंवा वापर करू नये, असे निर्दे श अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.राज्यातील संबंधित परवानाधारकांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संबंधित सहायक आयु्नत जिल्हा कार्यालयाला काेणत्याही साठ्याची किंवा पुरवठ्याची माहिती त्वरित कळवण्याचे निर्देश दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक दा. रा. गहाणे यांनी दिली.