सुलभ धाेरणामुळे राज्यात उद्याेजकांसाठी पाेषक वातावरण

    11-Oct-2025
Total Views |
 
 

CM 
 
राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धाेरण राबवत आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धाेरण आहे. त्यामुळे राज्यातील गुंतवणूक फायदेशीर आहे.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्याेगस्नेही राज्य असून, दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशांतील उत्कृष्ट विद्यापीठांसाेबत भागीदारी करण्यात आली असून, माेठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार हाेत आहे. राज्यात उद्याेगांसाठी पाेषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्र्यांनी येथे ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली.
 
यावेळी त्यांनी राज्यातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई विमानतळ, सी- लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास हाेत आहे.वाढवण बंदर विकसित केले जात असून, बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रीयल झाेनच्या माध्यमातून हा परिसर ‘चाैथी मुंबई’ म्हणून विकसित हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.ब्रिटिश शिष्टमंडळातील सदस्यांनीही महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या उद्याेगक्षेत्राबद्दल समाधान व्यक्त केले.एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. राज्यात सुरू असलेल्या विकास कामांचे काैतुक करून राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचेही ब्रिटिश सदस्यांनी सांगितले.