डाव्या पायाचा तळवा खाजत असेल तर काय हाेते?

    10-Oct-2025
Total Views |
 

Health 
 
सर्वसाधारण सगळीकडे आढळणारी अंधश्रद्धा म्हणजे डाव्या पायाचा तळवा खाजणे. याचा अर्थ त्या व्यक्तीला प्रवास घडणार आहे असे मानले जाते. भविष्यात तुम्हांला कुठेतरी जाण्याची संधी मिळणार आहे किंवा तुम्हांला लांबच्या प्रवासाला जावे लागणार आहे.
उजव्या पायाचा तळवा खाजत असेल तर तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करणार आहात जिथे दुसरे घर मिळाल्यासारखे तुम्हांला वाटू शकते. दरम्यान,असेही म्हटले जाते की, डावा पाय खाजणे म्हणजे अशा प्रवाशाची सूचना मानली जाते, ज्या प्रवासाचा शेवट वाईट हाेणार असताे.छाेट्या समाजाच्या संस्कृतीमध्ये पायाची खाज हे सूचित करते की, तुम्ही एका ठिकाणी बसून राहू नये. तुम्ही सतत फिरत रहावे. काही संस्कृतींमध्ये पाय खाजणे म्हणजे तुमचा पुढचा बुटाचा जाेड तुम्हांला लाभणार नाही असेही मानले जाते.डावा पाय विरुद्ध उजवा पाय अंधश्रद्धा या प्रदेशानुसार बदलत जात असतात.
 
केवळ प्रदेशानुसारच नव्हे तर पायानुसारही त्या बदलत जातात. म्हणजे तुमच्या पायाचा तळवा खाजताे एवढ्यावर भागत नसते तर कुठल्या पायाचा खाजताे यावरून वेगवेगळ्या अंधश्रद्धा आढळतात.जर तुमच्या डाव्या पायाचा तळवा खाजत असेल तर तुमचा प्रवास अनपेक्षितपणे आणि माेठा नुकसान साेसावे लागून थांबेल. हे नुकसान पैशाच्या स्वरुपात किंवा आराेग्याच्या स्वरुपात असू शकते. जर तुमचा उजवा पाय खाजत असेल तर तुमचा प्रवास फायदेशीर ठरणारा असताे.आणखी एक अंधश्रद्धा म्हणजे जेव्हा तुमच्या डाव्या पायाचा तळवा खाजत असताे तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही लगेचच करणाऱ्या कामात तुम्हांला अपयश येणार असते. उजव्या पायाचा तळवा खाजणे म्हणजे लवकरच तुम्ही कुठल्यातरी नव्या कामाला सुरवात करणार असता आणि त्यात तुम्हांला यश मिळणार असते.