आता स्वप्न अंतराळ पर्यटनाचे...

    01-Oct-2025
Total Views |
 
 

space 
 
शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे पायलट आहेत. त्यांना प्रगत सुखाेई लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव आहे. त्यांनी रशियन अंतराळ संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे. विशेष अभिमानाची गाेष्ट म्हणजे ते अंतराळ यानाचे पायलट हाेते. शुभांशु शुक्ला आणि त्यांच्यासाेबत असलेले एक अमेरिकन आणि दाेन युराेपीयन अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवले. हा काळ त्यांनी गुरुत्त्वाकर्षणाशिवाय घालवला आणि अनेक नवीन प्रयाेग केले. पृथ्वीपासून 400 किलाेमीटर अंतरावर असलेल्या अंतराळ स्थानकावर पाेहाेचण्यासाठी त्यांना 28 तासांचा प्रवास करावा लागला.
 
सखाेल प्रशिक्षण
 
अंतराळ स्थानकात राहण्यासाठी आणि अंतराळयान चालवण्यासाठी, अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि युराेपीयन अंतराळ संस्थेत सखाेल प्रशिक्षण घ्यावे लागते.अमेरिकेतील ह्युस्टन येथील अ‍ॅक्सिओम स्पेस नावाच्या कंपनीचा हा खासगी प्रकल्प हाेता.
 
एका अंतराळवीराची फी 715 काेटी रु. घेतली
 
संपूर्ण प्रकल्प 3500 काेटी रुपयांचा हाेता. अ‍ॅक्सिओम कंपनीने एका अंतराळवीराकडून 715 काेटी रुपये घेतले, म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, इस्राे आणि आपल्या देशाच्या केंद्र सरकारने शुभांशु शुक्लासाठी इतके पैसे खर्च केले आहेत. आता जगातील सर्वांत श्रीमंत नागरिकांनीही अंतराळात फिरण्यासाठी बुकिंग केले आहे.
 
अंतराळ पर्यटनाकडे वाटचाल
 
अंतराळ पर्यटन हा भविष्यातील फायदेशीर व्यवसाय मानला जाताे. त्यामुळे त्यात पाय राेवण्यासाठी कंपन्यांमध्ये आधीच स्पर्धा सुरू झाली आहे. अ‍ॅक्सिओम स्पेस कंपनीचे सीईओ तेजपाल भाटिया हे भारतीय आहेत. त्यांनी सांगितले की, भविष्यात आम्ही जगातील काेणत्याही नागरिकाला किंवा अंतराळ स्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी पर्यटन व्यवसाय विकसित करत आहाेत.
 
अंतराळ पर्यटनातील नावाजलेल्या कंपन्या
 
रिचर्ड ब्रॅन्सनची व्हर्जिनिया, अमेझाॅनचे मालक बेझाेसची ब्लू ओरिजिन आणि एलाॅन मस्कची स्पेसएक्स कंपनी अंतराळ पर्यटनात आहेत. पृथ्वीवरून अवकाशात 11 मिनिटांपासून जास्तीत जास्त 80 मिनिटांपर्यंतच्या सहली ते देतील. गुरुत्त्वाकर्षणाच्या बलाबाहेर जाण्याचा काही मिनिटांचा अनुभव देणार आहेत. हा अनुभव विमान, राॅकेट, हाॅट बलूनमधून घेता येईल.
 
अंतराळ स्थानकावर जाण्यास फिटनेस गरजेचा
 
जगातील काेणत्याही नागरिकाला अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी फिटनेस निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. या पर्यटकांना नासा अंतराळवीरांप्रमाणे प्रशिक्षणही देण्यात येईल. अंतराळ स्थानकावर 14 दिवस राहताही येईल. तिथे आधीचे प्रशिक्षित अंतराळवीर सर्व प्रकारची मदत करतील. पर्यटकाला जमिनीवर दिले जाणारे प्रशिक्षण इतके याेग्य असेल, की त्याला अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवणे हा एक अविस्मरणीय थरार वाटेल.
 
अंतराळवीर बनण्यासाठी एक हजार तासांचे प्रशिक्षण
 
अंतराळवीर बनण्यास तयार असलेल्या व्यक्तीला कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष राहावे लागते. एकूण 700 ते 1000 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. नासा, स्पेसएक्स, युराेपीयन स्पेस एजन्सी, जपानी स्पेस एजन्सी आदींच्या प्रशिक्षण केंद्रात, अंतराळवीराला एक महिना शून्य गुरुत्त्वाकर्षणाच्या अंतराळ स्थानकात राहावे लागते.
 
महिनाभर ्नवारंटाइन
 
अंतराळवीराला अंतराळ स्थानकावर जाण्यापूर्वी शेवटचा महिनाभर क्वारंटाइनमध्ये (काेणाच्याही संपर्कापासून दूर) राहावे लागते. वैयक्तिक स्तरावर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी देशाच्या अंतराळ संस्थेची मंजुरी घ्यावी लागेल.त्याच्याशी संबंधित काही कायदेशीर अटी आणि कागदपत्रे पूर्ण करावी लागणार आहेत.पर्यटकांची संख्या वाढेल आगामी काळात अंतराळ स्थानकाला भेट देण्यासाठी तांत्रिक प्रगती वाढत जाईल. नागरिकांना प्रशिक्षणही अधिक चांगले मिळेल. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास या क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.