पंडित दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शनाचे प्रतीक

    01-Oct-2025
Total Views |
 
 

sewa 
 
‘समाजातील गाेरगरीब, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संपूर्ण जीवन वेचले. त्यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्याेदयाचा संदेश सर्वदूर पाहाेचवण्यासाठी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने आयाेजिलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारंभाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. यवतमाळचे पालक मंत्री संजय राठाेड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डाॅ. अशाेक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयाेगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव व पदाधिकारी उपस्थित हाेते.
 
प्रारंभी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकस्थळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पं. दीनदयाळजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार अर्पण करून अभिवादन केले. मूर्तीकार सुजीत गाैड व पत्नी स्वाती गाैड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठानच्या परिसरात असलेली प्रशिक्षण प्रबाेधिनी, शबरी अतिथीगृह, निवासी संकुल, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कक्ष, कृषी संशाेधन व प्रशिक्षण केंद्र आदींची पाहणी केली. निवासी संकुलाच्या आवारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.