साेमेश्वर मंदिर देवस्थान परिसराचा विकास आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री पवार

    01-Oct-2025
Total Views |
 
 

temp 
 
 
श्री क्षेत्र साेमेश्वर मंदिर देवस्थानाला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असल्याने येथे माेठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन परिसर विकास आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी दिले. श्री क्षेत्र साेमेश्वर मंदिर देवस्थानातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व बारवेचे लाेकार्पण करताना पवार बाेलत हाेते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठाेड, कार्यकारी अभियंता अमाेल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी किशाेर माने, पंचायत समितीचे उपअभियंता शिवकुमार कुपल, श्री साेमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम साेरटे, साेमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत माेकाशी आदी मान्यवर उपस्थित हाेते.पवार यांनी साेमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील कामांची पाहणी केली. आगामी 50 वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याची सूचना पवार यांनी केली.