मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकात बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्राे, अंतर्गत मेट्राे, बस, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके; तसेच लगतचे सर्व माेठे महामार्ग आणि विशेष रस्त्यांद्वारे विमानतळही जाेडण्यात येणार आहे.ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार हाेणार आहे. त्यामुळे भविष्यात बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय व नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पाेरेशन लिमिटेडच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका आयु्नत साैरभ राव यांच्या नेतृत्वात शहर विकास विभागाने चर्चासत्र आयाेजिले हाेते. त्यात केंद्रीय नगर नियाेजन संघटना, जपान इंटरनॅशनल काे-ऑपरेशन एजन्सी (जायका), नगररचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण डाेंबिवली आणि वसईृ-विरार महापालिकेचे प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले हाेते.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण 12 स्थानके आहेत. त्यापैकी 4 स्थानके (मुंबई, ठाणे, विरार, बाेईसर) महाराष्ट्रात आहेत. या स्थानक परिसरांचा नियाेजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी केंद्र सरकार, जपान सरकार व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला आहे. ठाणे व विरार स्थानक परिसराचा नियाेजनबद्ध विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी, जायका व नगरविकास विभाग संयु्नतपणे करत आहे. या नियाेजनात सर्व भागधारक घटकांचा समावेश करून त्यांना नेमक्या काेणत्या गाेष्टी अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी हे चर्चासत्र घेण्यात आले.केंद्राचा हा संवाद उपक्रम संपूर्ण प्रकल्प क्षेत्रात हाेणार आहे. त्याची सुरुवात ठाणे आणि विरार स्थानक परिसर विकास चर्चे ने हाेत असल्याचे केंद्रीय गृह आणि नागरी विकास मंत्रालयाच्या अतिर्नित सचिव डी. थारा यांनी सांगितले. नागरिकांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा, राज्यात या परिसराचा ट्रान्सिट ओरिएंटेड विकास व्हावा या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे अतिर्नित मुख्य सचिव (नगरविकास विभाग) असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले.