महिला कर्मचाऱ्यांनी आराेग्य सांभाळून काम करावे‘

    01-Oct-2025
Total Views |
 

ladies 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रमुख पदांवर महिलांना संधी दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदांसह अनेक विभागांच्या अपर मुख्य सचिव महिलाच आहेत. वीजक्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिला घर सांभाळून ऑफिसही तितक्याच ताकदीने सांभाळतात.एकाचवेळी त्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. महिला कर्मचाऱ्यांनी आराेग्य सांभाळून काम करावे,’ असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर यांनी येथे केले.गणेशखिंड येथील महावितरणच्या प्रकाश भवन कार्यालयात झालेल्या ‘सन्मान साैदामिनीं’चा कार्यक्रमात बाेर्डीकर बाेलत हाेत्या. नवरात्रानिमित्त स्त्रीश्नतीचा सन्मान करण्यासाठी महावितरण पुणे परिमंडलाने या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. या प्रसंगी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे व धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, विजयानंद काळे, संजीव नेहते व अनिल घाेगरे यांच्यासह सर्व महिला अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेत्या.
 
महिलांना त्यांच्या घरातून चांगले वातावरण मिळाल्यास त्या अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात.विजेसारख्या जाेखमीच्या क्षेत्रात महिलांना अनेक आव्हानांना सामाेरे जावे लागते; तसेच त्यांना त्यांच्या वैय्नितक अडचणींवरही मात करावी लागते. महावितरणने महिला कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण तयार करून दिले आहे. म्हणूनच महिला पुरुषांप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशावेळी महिलांनीही स्वत:च्या आराेग्याची काळजी घेऊन ग्राहकसेवेसाठी तत्पर राहावे, असे बाेर्डीकर यांनी सांगितले.बाेर्डीकर यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गाैरव करण्यात आला. वर्षा कारंडे, भ्नती जाेशी, स्वागती साेळंकुरे, पूजा मेश्राम या महिला कर्मचाऱ्यांनी मनाेगत व्य्नत करत महावितरणमध्ये महिला कर्मचारी करत असलेल्या कामांवर प्रकाश टाकला. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर दीपश्री सराेदे व साेनाली राठाेड-चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.