पत्र तेविसावे
असे म्हणणाऱ्या चाेखामेळ्यांचे अभंग तू नीट वाचून पहा.महान वारकरी संत चाेखामेळा म्हणतातदेहे देखिली पंढरी। आत्मा अविनाश विटेवरी।। ताे पाहा पांडुरंग जाणा। शांति रु्निमणी निजांगना।। आकारले तितुके नासे। आत्मा अविनाश विठ्ठल दिसे।। ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायी। चाेखामेळा जडला पायी।। परमार्थाच्या प्रांतात तू आता खराेखर सज्ञान झाली आहेस.तू आता खूप विचार करू लागली आहेस. गीता वाचून तू आपल्या पत्रात सात्त्विक, राजस व तामस याबद्दल काही लिहिले आहेस. या बाबतीत मी तुला एक नवीन विचार सांगताे.माणसे तीन प्रकारची असतात. जीवनाचा विचार करताना ज्यांची दृष्टी अंतर्मुख असते ते सात्त्विक. जीवनाचा विचार करताना ज्यांची दृष्टी बहिर्मुख असते ते राजस व जीवनाचा विचार करताना ज्यांना मुळीच दृष्टी नसते ते तामस.
तू सात्त्विक आहेस. अंतरंगातील देवाचा शाेध व बाेध घेणे यातच तुझ्या जीवनाची सार्थकता आहे. असा शाेध व बाेध घेत असताना आपणाला काही प्रमाणात देव भेटताे. पण तू असे लक्षात घे कीदेवाचा संपूर्ण साक्षात्कार कुणालाच हाेत नाही. अंतरंगातील देवाचा जास्तीत जास्त साक्षात्कार जन्मभर करून घेणे यातच जीवनाचा आनंद साठवलेला असताे.‘मी काेण’ समजणे म्हणजे अंतरंगातील देव समजणे, आपल्या आपणासी लाभ म्हणजेच अलभ्य लाभ. या बाबतीत आपणच प्रयत्न करायचा असताे. इतर लाेकांचे अनुभव आपल्या उपयाेगी पडतात, पण इतर करण्याचा अनुकरण करून भागत नाही. अनुकरण हे मरण आहे.मी काेण याचा शाेध बाेध घेणे व त्या शाेधाला नि बाेधाला असलेल्या उद्याेगांत रमून जाणे यातच जीवनाची सफलता आहे.
या बाबतीत असणारा संवाद हा जीवनाचा सुगंध आहे व या बाबतीत हाेणारा विसंवाद हा जीवनाचा दुर्गंध आहे.पाच पंचवीस पुस्तके वाचून मला सारे कळले असे तू कदापि म्हणू नकाेस. असे म्हणणे म्हणजे जीवनाचे थडगे रचण्याप्रमाणे आहे.बायबलवर भाष्य करणाऱ्या एका विद्वानाने म्हटले आहे कीWhen you reach a conclusion you are dead,, या वा्नयात फार माेठा अर्थ भरला आहे.तू परमार्थाच्या मार्गात प्रवास करत आहेस. या मार्गात ज्यांनी प्रवास केला त्याचे ऋण तू मान. पितृऋण, ऋषिऋण व देवऋण या ऋणांचे तू सदैव स्मरण ठेव. आल्डस ह्नसलेने जे त्रिविध वर्गीकरण केले आहे त्याबद्दल त्याने म्हटले आहे- (i) Animal grace (ii) Human grace d (iii) Spiritual grace..आपण आपला प्रवास अॅडमच्या प्राथमिक अवस्थेपासून सुरू करायचा नाही. आपल्या आधी ज्यानी परमार्थमार्गात प्रवास केला आहे त्यांना वंदन करून व त्यांचे ऋण मानून आपण आपला मार्ग आक्रमावयाचा आह