जीवनात महान कार्ये स्वत:हून घडून येत नाहीत, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.वैष्णाेदेवीच्या यात्रेसाठी कुणी 70 वर्षांची वृद्धा किंवा 7 वर्षांचा मुलगा चढ चढू लागताे, तेव्हा ते केवळ वरती पाहतात. ते कधीही मागे वळून पाहात नाहीत आणि कुणाच्या मदतीची आशाही करत नाहीत.संकल्पशक्तीच्या बळावर वरती चढत जातात. आयुष्याच्या विकासयात्रेला उंची प्राप्त करून देण्याकरिता अशाच दृढ संकल्पाची आवश्यकता भासते.