2. व्यापारी : साहसी व्य्नतीच व्यापार करू शकते, उद्याेजक बनू शकते. अर्थशास्त्रात उद्याेगाचे एक सूत्रच आहे; "No Risk, No Gain.' अर्थात साहसाशिवाय व्य्नती मालामाल हाेत नाही आणि पिकते तिथे विकत नाही. म्हणून व्यापारी दूर देशी जाऊनसुद्धा माल विकतात आणि घेतात. (आयात-निर्यात) बाजारपेठ जेवढी माेठी तेवढा धंदाही तेजीत राहताे. परदेशात मालाला भावही चांगला मिळताे. म्हणून रस्त्याने जाताना वाटमारी करणारे लुटारू, जलप्रवासाच्या वेळीच वादळे, आपत्ती, वायुमार्गे जाताना विमान अपहरण व अपघाताचा धाेका सदैव असताेच. त्यामुळे व्यापारासाठी साहस हे हवेच.