पक्ष्यांचे वास्तुकलेतील काैशल्य

    08-Apr-2024
Total Views |
 
 
 

Home 
नवल म्हणजे एवढ्या संशाेधनानंतरही घरटे बनवण्याची कला ही पक्ष्यांचे सहज काैशल्य मानले जाते, जे त्यांना न शिकता निसर्गत:च प्राप्त हाेते. पण अलीकडील काळात दाेन वेगवेगळ्या संशाेधनातून असे कळते की माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही घरटे बनवण्याचे ज्ञान ज्येष्ठ पक्ष्यांकडूनच मिळते. यामध्ये पारंगत हाेण्यासाठी त्यांनाही सतत अभ्यास करण्याची गरज असते.संशाेधनानुसार सर्वच पक्ष्यांना घरटे बनवण्याची कला येण्याची गरज नसते. ज्यांना याची आवड असते तेच पक्षी घरटे बनवण्याची कला शिकतात.एवढेच नव्हे तर वैज्ञानिकांना असेही आढळून आले आहे की, पक्ष्यांना घरटे बनवण्यासाठी याेग्य सामग्री निवडण्याचे ज्ञानही असते. तसे नरांच्या तुलनेत मादींना घरटे बनवण्यात जास्त रुची असते.
 
काेणती सामग्री घरट्यासाठी जास्त उपयुक्त आहे याचीही उत्तम पारख पक्ष्यांना असते. याबाबत पहिले संशाेधन नुकतेच इंग्लंडच्या एडनबर्ग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केले, तर दुसरे संशाेधन इंग्लंडच्या कित्येक विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे केले.जे विश्वप्रसिद्ध विज्ञानसंस्था राॅयल साेसायटीच्या विभागीय पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भूगाेलातील लाेकांच्या घरांच्या बनावटीत भिन्नता असते काहीशी त्याप्रमाणेच विविध माेसम, वातावरणात राहणाऱ्या पक्ष्यांच्या घरट्यांतही भिन्नता असते. एकच पक्षी दरवेळी एकसारखे घरटे बनवत नाही. जागा व माेसम बदलल्यास पक्षी आपल्या घरट्याची बनावट बदलतात.
 
एक मात्र खरे, ते म्हणजे प्रत्येक जातीचे पक्षी घरटे बनवण्याच्या कलेत एकसमान कुशल नसतात. काही जाती याबाबतीत प्रगत कारागिरीने भरलेले असतात तर काही अडाणी असतात. एखाद्या प्रशिक्षित विणकराप्रमाणे आपले घरटे बनवणाऱ्या बया पक्ष्याला इंग्रजीत ‘वीव्हर बर्ड’ म्हणजेच बुकर पक्षी या नावाने ओळखले जाते. उंच झाडावर घरटे बनवणारा पावश्याही घरटी कलेत अत्यंत प्रवीण असताे. मैना, चिमणी, अमेरिकन पक्षी राॅबिन, हमिंग बर्ड, गाेल्ड फिंच, ब्राॅड बिल, आ्निर्टक प्रदेशातील पक्षी रेडपाॅल,मॅगनाेलिया, मार्श रेन, गालपागाेज फिंच, वेस्टन किंगबर्ड, स्पाॅटेड नाइटिंगेल इ.ची घरटे निर्मितीची कला व तंत्र प्रगत असते. पण गिधाड, घार, गरूड, सारस, माेर, ससाणा असे माेठे पक्षी घरटे बनवण्यात जास्त प्रवीण नसतात. सारेच पक्षी झाडावर घरटे बांधत नसतात तर काही पक्षी जमिनीत बीळ खाेदूनही त्यात राहतात. काही गुहांमध्ये, झाडांच्या ढाेलीत, वाळूच्या टेकडीत, ओसाड जागी, झुडपांमध्येही राहतात.