व्हाॅट्सअ‍ॅपवर बॅन न हाेण्यासाठी घ्यावयाची दक्षता

    15-Apr-2024
Total Views |
 
 

whatsapp 
 
 व्हाॅट्सअ‍ॅप आपल्याला इतर यूजरविरुद्ध तक्रार करण्याची परवानगी देते. अशाप्रकारची एखादी तक्रार आपल्याविरुद्ध असेल आणि ती याेग्य असेल तर आपले अकाउंट डिअ‍ॅक्टिव्ह केले जाईल.
 
 एखादा यूजर आपल्या काॅन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि आपण त्याला माेठ्या संख्येत मेसेज पाठवत असाल तर ते व्हाॅट्सअपच्या नियमांविरुद्ध असते. अशाप्रकारे ऑटाे मेसेज, ऑटाे डायलिंगही तिरक्या नजरेने पाहिले जाते.
 
 या अ‍ॅपद्वारे जर व्हायरस वा मालवेअर इतर यूजरपर्यंत पाेहाेचवत असाल तर या कृत्याची शिक्षा म्हणून अकाउंट बॅन केले जाईल.
 
 एखादा यूजर बेकायदेशीर, चुकीचा, घातक वा धमकीवजा संदेश पाठवत असेल तर त्याचे अकाउंट सस्पेंड केले जाऊ शकते. तसेच हिंसक वा अश्लील गुन्हेगारीला प्राेत्साहन देणारा संदेशही येथे गैर मानला जाताे.
 
 आपण दिलेल्या माहितीत काेणतीही चूक असेल तर ताे ेक अकाउंट समजला जाईल.अशावेळी आपण बॅन हाेऊ शकता.
 
 व्हाॅट्सअप काेडसाेबत काेणत्याही प्रकारची छेडछाड हा अ‍ॅप पसंत करीत नाही व त्वरित बॅन केला जाताे.
 
 जर अनेक यूजर्सने आपल्याला या अ‍ॅपवर ब्लाॅक केले असेल तर आपल्यावर व्हाॅट्सअपची नजर असते. काहीही चूक वाटले तर आपले अकाउंट बॅन केले जाईल.
 
 जर एखाद्या यूजरची माहिती बेकायदेशीररित्या मिळवण्याचा प्रयत्न केला वा या अ‍ॅपचा सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न केला तरी बॅन लागू शकताे.
 
 व्हाॅटसअप प्लस यासारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपसाठीही कंपनीच्या आपल्या वेबसाइटवर लिहा की याच्याशी आमच्या कंपनीचे काेणतेही देणे-घेणे नाही. अशावेळी याचा उपयाेगही बॅनचे कारण बनू शकते.