सुखद झाेप येण्यासाठी चार वैज्ञानिक उपाय

    15-Apr-2024
Total Views |
 
 
 

health 
उत्तम झाेप येण्यासाठी सांगितले उपाय...
1. झाेपण्याची नव्हे, तर जागे हाेण्याची वेळ निश्चित करा : आपण दरदिवशी वेगवेगळ्या वेळी झाेपत असाल, तरी सकाळी जाग येण्याची वेळ ठरवणे कठीण असते. पेनिसिल्वेनिया विद्यापीठातील एसाेसिएट प्राेफेसर इलेन राॅजर सांगते की, झाेपण्याची वेळ ठरवण्याऐवजी जागे हाेण्याची वेळ निश्चित करा. हा अभ्यास आपल्या शरीराला सकाळी जागण्यासाठी 7 ते 8 तास आधी एका ठराविक वेळी झाेपण्याचा संदेश देऊ लागेल. व झाेपण्याची वेळ निश्चित हाेईल.
 
2. फाेन बेडरूमबाहेरच चार्ज करा : विविध शाेधांतून दिसून आले आहे की, झाेपताना माेबाइलचा वापर केल्यास झाेपेच्या गुणवत्तेवर परिणाम हाेताे. ही सवय बदलण्याची एक उत्तम पद्धत आहे की, फाेन नेहमी बेडरूमबाहेरच चार्ज करावा.आपण माेबाइलचा वापर अलार्मच्या रूपात करीत असाल, तर त्याऐवजी अलार्मचे घड्याळ वापरावे, जेणेकरून माेबाइल जवळ ठेवण्यास कारण मिळू नये.
 
3. बेडवर ऑफिस वा घरचे काेणतेही काम करू नका : मानसशास्त्रीय रूपात बेड व झाेपेचा सरळ संबंध असताे. जेव्हा आपण बिछान्यात झाेपताे, तेव्हा आपल्याला आराम व हलकेपणा जाणवायला हवा; पण जेव्हा आपण घर वा ऑफिसचे काम बेडवर करू लागताे तेव्हा मेंदू या अवस्थेऐवजी शरीराला जागे राहण्यास सक्रिय करू लागताे. ज्यामुळे झाेपेच्या गुणवत्तेवर परिणाम हाेताे व झाेप अर्धवट लागते.
 
4. रूम 18-19 एवढी थंड ठेवावी : कॅलिफाेर्निया विद्यापीठ, लाॅस एंजेलिसमधील स्लीप डिसऑर्डर सेंटरचे डाॅ. अ‍ॅलाेन वाय यांच्या मते, जेव्हा आपल्याला झाेप येते तेव्हा शरीराचे तापमान कमी हाेते. ज्यामुळे झाेपेची स्लीप सायकल नियंत्रित करणारे नैसर्गिक हार्माेन मेलाटाॅनिनची सक्रियता वाढते. रूम टेंपरेचर 18-19 डिग्री ठेवले तर झाेप येण्यास मदत हाेते.