उन्हाळ्यात गरम हवा अस्थम्याची लक्षणे वाढवू शकते

    13-Apr-2024
Total Views |
 
 

health 
अ‍ॅलर्जीही बनू शकते दमा : अस्थमामुळे फुफ्फुसांपर्यंत हवा नेणाऱ्या श्वासनलिका अतिसंवेदनशील हाेतात. उत्तेजना निर्माण करणाऱ्या प्रत्येक वस्तूने त्यात तीव्र प्रतिक्रिया हाेते.या वस्तूंना अस्थमा ट्रिगर्स म्हणतात. या ट्रिगर्सच्या संपर्कात श्वासनलिकेच्या मांसपेशी कडक हाेऊन आकसतात.यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास, खाेकला, छातीत जखडल्यासारखे जाणवणे असे त्रास हाेतात.अस्थमा असणाऱ्यांना रात्री व्यायाम वा जादा शारीरिक श्रम केल्यास लक्षणे जास्त गंभीर हाेतात.
 
शरीराला पुरेसा ऑ्निसजन मिळू न शकल्यामुळे अस्थमा अ‍ॅटॅक ट्रिगर हाेताे जाे घातक असू शकताे.ज्या वस्तू अस्थमासाठी ट्रिगरचे काम करतात, त्याच अ‍ॅलर्जीही करतात. जेव्हा अ‍ॅलर्जिक वस्तूंच्या संपर्कात आल्यानंतर अस्थमा अ‍ॅटॅक हाेताे, तेव्हा त्याला अ‍ॅलर्जिक अस्थमा म्हणतात. काहींना फूड अ‍ॅलर्जीनेही अस्थमा अ‍ॅटॅक हाेताे.याशिवाय आपल्याला अ‍ॅलर्जिक अस्थमा नसेल, फ्नत अ‍ॅलर्जी असल्यास अस्थमा हाेण्याचा धाेका 40%पर्यंत वाढताे. एका अंदाजानुसार 25% भारतीय अ‍ॅलर्जीने पीडित आहेत. यापैकी पाच ट्नके लाेकांची अ‍ॅलर्जी अस्थमात बदलते. उन्हाळ्यात हाेणारे 60% अस्थमा अ‍ॅटॅक पर्यावरणात असलेल्या अ‍ॅलर्जन्समुळे हाेतात.
 
जाेखमीची कारणे आनुवांशिक कारक : ज्यांच्या आई-वडील दाेघांना अस्थमा असेल त्यांच्यात याचा धाेका 8-10%, तर दाेघांपैकी एकाला असल्यास 6-8% पर्यंत वाढताे.
 
खराब जीवनशैली : शारीरिक सक्रियतेचा अभाव, खराब खाणे-पिणे, आराेग्याबाबत बेपर्वाई हाही अस्थमाचा माेठा रिस्क फॅ्नटर आहे.
 
अ‍ॅलर्जी व हवा प्रदूषण : अ‍ॅलर्जी व हवा प्रदूषण जगभरातील अस्थम्याचे मुख्य कारण आहे.
 
धूम्रपान : धूम्रपान करणे वा अशा व्य्नतींच्या संपर्कात राहणे अस्थमाचे कारण हाेऊ शकते.इतर कारक : रसायनांचे ए्नसपाेजर, व्हायरल इन्फे्नशन, तीव्र वासाचे परफ्यूम, कित्येक औषधांचा दुष्परिणाम इ.
 
मानसिक तणाव : तणावही अप्रत्यक्षपणे अस्थमाचे कारण हाेऊ शकते. सतत मानसिक तणावाने शरीराची राेगप्रतिकार क्षमता कमी हाेते.
 
काेराेना आणि अस्थमा : काेराेना व दमा या दाेन्ही राेगांची अनेक लक्षणे मिळतीजुळती आहेत. अस्थमा रुग्णांना काेराेना हाेण्याची श्नयता इतर लाेकांएवढीच असते; पण त्यात समस्या निर्माण हाेण्याची श्नयता अधिक असते.अस्थमा व काेराेना व्हायरस दाेन्हीही रुग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम करतात. एखादा रुग्ण गंभीर अस्थमाने पीडित असेल व त्याच्या फुफ्फुसात सूज असेल, तर काेराेनाची लक्षणे गंभीर हाेण्याचा धाेका वाढताे. यामुळेच अस्थमा रुग्णांनी सर्व दक्षता बाळगणे व लस घेणे अत्यंत आवश्यक आहे.
उन्हाळ्यात अस्थमा वाढण्याची कारणे
 
 गरम हवा हलकी असल्यामुळे वेगाने वाहते. ज्यामुळे परागकण, धूळमाती व इतर प्रदूषक जास्त प्रमाणात एका जागेवरून दुसऱ्या जागी पाेहाेचतात.
 
 घराच्या दारे-खिड्नयांच्या काचा जास्त उघड्या ठेवल्यामुळे अस्थमा ट्रिगरच्या संपर्कात आल्यामुळे धाेका वाढताे. उकाड्याच्या वातावरणात बुरशीही जास्त निर्माण हाेते जी दमा वाढवते.
 
 अस्थमा हिवाळी राेग आहे, या गैरसमजामुळे अनेकजण उन्हाळ्यात आपली औषधे घेण्यात थाेडी बेपर्वाई करतात. यामुळे अस्थमा अ‍ॅटॅकचा धाेका वाढताे.