माठातील पाणी चव आणि आराेग्यासाठी लाभदायक

    31-Mar-2024
Total Views |
 
 

Water 
 
आता मातीच्या भांड्यांची जागा धातुच्या भांड्यांनी घेतली आहे. पण तरीही काेणत्या ना काेणत्या रूपात आज मातीची भांडीही आपली ओळख कायम टिकवून आहेत. मातीचा सुगंध आपल्या मनाला भावताे. तसंच माती आपल्या शरीरासाठीही औषध म्हणून काम करते.मातीमध्ये अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. माठ आपल्यामध्ये पाण्यात असलेले धुलीकण आणि सूक्ष्म जीवाणू यांना शाेषून घेताे. ज्यामुळे पाणी स्वच्छ हाेतं. माठातील पाणी पिण्याचे इतरही ायदे आहेत, जाणून घेऊ...
 
विषारी पदार्थ शाेषून घेते : मातीमध्ये शुद्धीकरणाचा असा गुण आढळताे, ज्यामुळे सगळे विषारी पदार्थ आत शाेषून घेतले जातात. पाण्यातून सगळे आवश्यक पाेषक घटक मिळतात. माठातील पाणी याेग्य तापमानात रहाते.ना जास्त थंड ना गरम. त्यामुळेच काेणत्याही वयाेगटातील व्यक्तींनी हे पाणी पिलं तरी त्यांना ते बाधत नाही.आजारांना ठेवते दूर : उन्हाळा सुरू हाेताच सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या आजूबाजूस पसरतात. सक्रिय हाेतात. यांच्यामुळे आपल्या आजूबाजूला मलेरिया, कावीळ, टायाॅइद, डायरिया यांसारखे आजार पसरतात. माठातील पाणी अशा आजारांशी लढण्यास सहाय्यक ठरते.
 
चयापचयास चालना : नियमितपणे माठातील पाणी पिण्याने राेगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत हाेते.प्लास्टिकच्या बाटलीत पाणी साठविण्याने पाण्यात अशुद्धी निर्माण हाेते. हे सुद्धा सिद्ध झालं आहे की, माठामध्ये पाणी साठविण्याने शरीरातील टेस्टाेस्टेराॅन हार्माेनची पातळी वाढते.
 
पाेटातील गॅसेसच्या समस्येपासून मुक्ती : जर तुम्ही ि्रजमधील पाणी पित असाल तर पाेटाच्या अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकताे. हे पाणी उष्ण गुणधर्माचे असते. ज्यामुळे वात वाढताे. माठातील पाणी खूप जास्त थंड नसण्याने वात वाढत नाही. पाेटही लवकर साफ हाेते. यामुळे पाेटातील गॅसेसची समस्या वाढण्याची शक्यता खूप कमी हाेते. ढेकर येण्याची शक्यताही कमी हाेते.
 
घसा रहाताे ठीक : सामान्यतः उन्हाळ्यात आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा हाेते. आपण ि्रजमधील पाणी सतत पिताे. पण पाणी खूप जास्त थंड असल्यास घसा आणि शरीरावर वाईट परिणाम हाेताे. यामुळे घशाच्या पेशींचं तापमान अचानक कमी हाेतं, ज्यामुळे घसा बसणे, ग्रंथींमध्ये सूज यांसारखी समस्या निर्माण हाेते. पण माठातील पाण्याचा असा दुष्परिणाम दिसत नाही.
 
पित्तापासून मुक्ती : तिखट-मसालेदार पदार्थ खाण्याने अनेकदा पित्ताची समस्या निर्माण हाेते. माठातील पाण्यात क्षारीय घटक आणि पाण्यातील घटक मिळून आवश्यक पीएच संतुलन निर्माण हाेते. ज्यामुळे शरीराचं नुकसान हाेणं टळतं आणि पित्तापासूनही बचाव हाेताे.
 
समाधान मिळते : उन्हाळ्यात ि्रज किंवा र्बाचं पाणी अनेकजण पितात, ते उष्ण गुणधर्माचे असते. यामुळे वातही वाढताे. र्बाचं पाणी पिण्याने बद्धकाेष्ठतेचा त्रास हाेण्याची शक्यता असते. घसाही खराब हाेताे. माठातील पाणी खूप जास्त थंड नसल्यामुळे वात वाढत नाही आणि ते समाधानही देते.