हा रंग वेगळाच

    31-Mar-2024
Total Views |
 
 

health 
 
हाेली या सणाचं आजचं विद्रूप स्वरूप बाजूला ठेवलं तर लक्षात येईल, की हा सण मुळात श्रीकृष्णाशी संबंधित आहे. किसनद्येव, किस्ना अशा प्रेमळ एकेरी नावांनी ओळखला जाणारा हा देव. त्याच्या प्रेमलीलांच्या कथा लाेक भक्तिभावाने वाचतात, हे एक आश्चर्यच. आजच्या जगातही स्फाेटक वाटावेत असे प्रेमसंबंध श्रीकृष्णाच्या बाबतीत क्षम्य हाेऊन जातात. बऱ्याच गाेष्टी भक्तीचं प्रतीक म्हणून झाकल्या जातात. बऱ्याच गाेष्टी देवाच्या लीला म्हणून स्वीकारल्या जातात.हाेळी हा श्रीकृष्णाशीच संबंधित सण. आज गाेकुळात रंग खेळताे हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ही सूचना केव्हापासून दिली जाते आहे पाहा.
 
हाेरी हा संगीतप्रकारही श्रीकृष्णाच्या हाेळीच्या लीलांनाच समर्पित आहे. त्यातून व्यक्त हाेणारा प्रेमरंग इथे गीतकार समीर सामंत यांच्या कवितेतून व्यक्त झालेला आहे. त्यातली प्रारंभिक कल्पनाच फार लाेभस आहे.इथे प्रियकर प्रेयसीला म्हणताे आहे की आजच्या दिवसातून वेळात वेळ काढून जरा माझी आठवण काढ आणि तुझ्या चेहऱ्यावर आपाेआप किती रंग उमलतील ते पाहा. प्रेयसीला प्रियकराची आठवण आली की तिच्या चेहऱ्यावर लज्जा, प्रीती, भेटीची ओढ, ती हाेत नसेल तर निराशा असे कितीतरी रंग एकदम झळकून जातील आणि तिला रंगपंचमी साजरी करण्याची गरजच पडणार नाही.